शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

रेव्ह पार्टीत सामील झालेल्या अभिनेत्री हीना पांचाळसह २४ संशयितांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 7:28 PM

Rave Party : नाशिक ग्रामीण पोलिसांनी एकूण २९ जणांना अटक केली असून बंगला मालकालाही मुंबईतून ताब्यात घेतले आहे.

ठळक मुद्दे न्यायालयाने पांचालसह सर्वांची पोलीस कोठही ५ जुलैपर्यंत वाढविली आहे.

नाशिक : इगतपुरीतील दोन आलिशान बंगल्यात बॉलिवूड अभिनेत्री संशयित हिना पांचालसह तब्बल २२ व्यक्ती मादक अंमली पदार्थांचे नशेत झिंगलेल्या अवस्थेत रेव्ह पार्टीत पोलिसांच्या छाप्यात शनिवारी मध्यरात्री पकडले गेले होते. पोलिसांनी एकुण २९ संशयितांना अटक करुन सोमवारी न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने १३ पुरुष आणि ११ महिला अशा २५ संशयितांना एक दिवसांची पोलीस कोठडी दिली होती. त्यामुळे मंगळवारी (दि.२९) या सर्वांना पुन्हा न्यायालयापुढे पोलिसांनी हजर केले. न्यायालयाने पांचालसह सर्वांची पोलीस कोठही ५ जुलैपर्यंत वाढविली आहे.

जिल्ह्यातील निसर्गरम्य ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इगतपुरीतील स्काय ताज आणि स्काय लगून व्हिला या दोन आलिशान बंगल्यामध्ये बिग-बॉस या मराठी सिझन-२मध्ये वाइल्डकार्ड घेऊन सहभागी झालेली अभिनेत्री हिना पांचलसह बॉलिवूड व दक्षिणात्य चित्रपटसृष्टीशी संबंधित असलेले कलाकार, कोरिओग्राफर असे एकुण २२ तरुण-तरुणी एकत्र येत दारु, हुक्का, गांजा, चरस, कोकेन यांसारख्या अंमली पदार्थांचे सेवन करत ‘हवाईयन थीम’च्या रेव्ह पार्टी करत होते. याबाबतची गोपनीय माहिती अपर पोलीस अधीक्षक शर्मीष्ठा वालावलकर यांना मिळाली. त्यांनी त्वरित याबाबत पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांना कळविले. त्यांचा ग्रीन सिग्नल मिळताच वालावलकर, उपिभागीय अधिकारी अर्जुन भोसले हे साध्या वेशात इगतपुरी पोलिसांचा फौजफाटा घेऊन मध्यरात्री बंगल्यांवर जाऊन धडकले. यावेळी पोलिसांनी पांचालसह १२ महिला आणि दहा पुरुषांना बंगल्यांमधून ताब्यात घेतले होते. सोमवारपर्यंत या गुन्ह्यातील संशयितांची संख्या २९वर जाऊन पोहचली होती. यामध्ये ११ महिला आणि १८ पुरुषांचा सहभाग निष्पन्न झाला आहे. यापैकी ७पुरुषांवर गुंगीकारक औषधी द्रव्य मन:प्रभावित  पदार्थ अधिनियम १९८५च्या (एनडीपीएस) कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर उर्वरित दहा पुरुषांसह ११ महिलांविरुध्द कोटपा कायदा, दारुबंदी कायदा आणि कलम-१८८नुसार कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांनी दिली आहे.

रक्त, लघवीचे नमुने प्रयोगशाळेतरेव्ह पार्टीतील २२ तरुण-तरुणींची वैद्यकिय तपासणी पोलिसांकडून करण्यात आली आहे. त्यांच्या सर्वांचे रक्त व लघवीचे नमुनेही संकलित करुन न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. दरम्यान, यापैकीप्रयोगशाळेतून अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार एनडीपीएस कायद्यांतर्गत संशयितांची संख्या वाढण्याची श्यक्यता आहे.

 

 

टॅग्स :Heena Panchalहिना पांचाळNashikनाशिकPoliceपोलिसCourtन्यायालय