शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
2
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"
3
"राज ठाकरे यांना फसवलं, इव्हीएममुळेच महायुती जिंकली’’, मनसेचा गंभीर आरोप
4
Jacqueline Fernandez : "तिला काहीच..."; सुकेशकडून महागड्या भेटवस्तू घेणाऱ्या जॅकलिन फर्नांडिसच्या वकिलांचा युक्तिवाद
5
IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर, स्वस्तात मिळेल फ्लाइट तिकीट आणि 'ही' सुविधा...
6
"बाप आखिर बाप होता है", मुलगी पराभूत झाल्यानंतर विजयी पित्याचे बॅनर चर्चेत!
7
 स्वबळावर बहुमताजवळ, तरीही मुख्यमंत्रिपदावर अडलंय घोडं, भाजपासमोर आहेत या अडचणी
8
ऐश्वर्या रायबाबत भावजयचीही क्रिप्टिक कमेंट, अभिनेत्रीसोबत कधीच फोटो शेअर करत नाही; कारण...
9
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम
10
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
11
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
12
Hit and Run Video: अहिल्यानगरमध्ये कारचालकाने चौघांना चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद 
13
Fact Check : बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा भाजपावर टीका करणारा 'तो' Video दिशाभूल करणारा
14
'सन ऑफ सरदार' फेम दिग्दर्शकाच्या १८ वर्षीय मुलाचं भीषण अपघातात निधन
15
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
16
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
17
Guru Pradosh 2024: कर्जमुक्त आयुष्यासाठी करा गुरु प्रदोष व्रत; दाखवा दही भाताचा नैवेद्य!
18
Rahul Gandhi : राहुल गांधींनी अदानींच्या अटकेची केली मागणी; विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा तहकूब
19
Infosys Employee Bonus : इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कंपनीनं केली ८५ टक्के बोनस देण्याची घोषणा
20
Sonia Meena IAS: माफियांनाही फुटतो घाम, सुनीता मीणांना का म्हणतात दबंग अधिकारी?

सीबीआयचा रोख आता सुशांतच्या आत्महत्येच्या कारणांवर! शेकडो तासांच्या तपासानंतर अखेर हत्या नसल्याचा निष्कर्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2020 6:20 AM

मानसिक छळ, आर्थिक कारण की उत्तेजक द्रव्याच्या व्यसनामुळे त्याने हे पाऊल उचलले याबाबत दोन दिवसांत निष्कर्ष निश्चित केला जाणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

- जमीर काझीमुंबई : गेल्या १३ दिवसांपासून अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूशी संबंधित सर्व व्यक्ती, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, संशयितांकडे शेकडो तास चौकशी आणि वैद्यकीय अहवालाच्या फेरतपासणीनंतर त्याने आत्महत्या केली असल्याचा निष्कर्ष केंद्रीय गुन्हा अन्वेषण शाखेच्या (सीबीआय) विशेष पथकाने काढला आहे. मानसिक छळ, आर्थिक कारण की उत्तेजक द्रव्याच्या व्यसनामुळे त्याने हे पाऊल उचलले याबाबत दोन दिवसांत निष्कर्ष निश्चित केला जाणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.सुशांतची मैत्रीण अभिनेत्री रिया, तिचा भाऊ, आईवडील, मॅनेजर, सीए, नोकर, वॉचमन यांचे जबाब, पोस्टमार्टेम रिपोर्ट, कूपर रुग्णालयातील डॉक्टरांचे जबाब तसेच मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या कागदपत्रांबाबत दिल्लीतील एम्स हॉस्पिटलच्या फॉरेन्सिक टीमकडून सकारात्मक रिपोर्ट आल्याने ही हत्या नसून आत्महत्या असल्यावर शिक्कामोर्तब केले आहे.महाराष्ट्र व बिहारमधील राजकीय वर्तुळात महत्त्वाचा विषय बनलेल्या सुशांतसिंहच्या आत्महत्येचा तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने १९ आॅगस्टला घेतल्यानंतर दुसºया दिवसापासून सीबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह जम्बो पथक मुंबईत ठाण मांडून तपास करीत आहे. सुशांतची हत्या झाली असावी, या शक्यतेने घरातील नोकर दीपेश सावंत, नीरज सिंग, मॅनेजर सॅम्युयल मिरांडा, मित्र सिद्धार्थ पिठानी, सीए संदीप श्रीधर, जया सहा, श्रुती मोदी आदींसह मुख्य संशयित रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविक, वडील इंद्रजीत आणि आई संध्या चक्रवर्ती यांच्याकडे चौकशी करण्यात आली.सुशांतच्या बेडरूममध्ये तीन वेळा क्राइम सिन रिक्रेट केला गेला. बिल्डिंगमधील शेजारी, वॉचमन, संबंधित प्रकरणाचा तपास करणारे मुंबई पोलीस अधिकारी, त्यांनी नोंदविलेले ५६ जणांचे जबाब, शवविच्छेदन करणारे डॉक्टर, कर्मचारी यांची अनेक तास सविस्तर चौकशी करण्यात येत आहे. त्यात काहींच्या जबाबात विसंगती आढळली असली तरी, सुशांतने आत्महत्या केल्याबद्दल ते ठाम आहेत. त्यासंबंधी एम्सकडे पाठविलेले वैद्यकीय अहवाल, कागदपत्रांची छाननी करून अहवाल पाठविला. त्यातही सुशांतने आत्महत्या केल्याबद्दलचा निष्कर्ष नोंदविल्याचे वरिष्ठ अधिकाºयांनी स्पष्ट केले.रियाच्या आईवडिलांची दुसºया दिवशीही झाडाझडतीमुंबई : सीबीआयच्या विशेष पथकाने सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीच्या आईवडिलांकडे सलग दुसºया दिवशी चौकशी केली. सुशांतशी संबंध आणि त्याच्या आजाराबद्दल चक्रवर्ती दाम्पत्याकडे विचारणा करण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार त्यांच्याकडे पुन्हा चौकशी करण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले. आज सकाळी चक्रवर्ती दाम्पत्य ११ वाजता सांताक्रुझ, डीआरडीओ गेस्टहाउसमध्ये पोहोचले. त्यांना स्वतंत्र व नंतर एकत्र बसवून अधिकाºयांनी चौकशी केली.प्रसारमाध्यमांविरोधात माजी आयपीसी अधिकारी कोर्टातउच्च न्यायालयात सुशांत आत्महत्याप्रकरणी मुंबई पोलिसांविरोधात प्रसारमाध्यमांनी चालवलेली चुकीची मोहीम थांबविण्यासाठी माजी पोलीस महासंचालक पी. एस. पसरीचा, डी. के. शिवानंद, संजीव दयाळ, सतीश माथूर, के. सुब्रमण्यम, माजी मुंबई पोलीस आयुक्त एम.एन. सिंग, डी. एन. जाधव, माजी अतिरिक्त महासंचालक के. पी. रघुवंशी अशा आठ माजी आयपीएस अधिकाºयांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मीडिया ट्रायल थांबवा अशी मागणी त्यांनी केली. मुंबई पोलिसांची प्रतिष्ठा धोक्यात आणतील अशा खोट्या, अपमानकारक आणि निंदनीय टिप्पण्या प्रसिद्ध करण्यास किंवा प्रसारित करण्यापासून माध्यमांना अडवावे, अशी मागणी याचिककर्त्यांनी केली आहे. सध्या सुरू असलेल्या तपासाचे वार्तांकन समतोल राखून करावे. तसेच ते निष्पक्ष असावे, असे निर्देश माध्यमांना द्यावेत, असेही याचिकेत नमूद आहे. संबंधित तपासाचे वार्तांकन प्रेस कौन्सिल इंडियाने आखलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसारच करण्यात यावे, अशीही मागणी याचिककर्त्यांनी केली आहे.गौरव आर्याचे मोबाइल जप्त; ईडीला तपासात असहकार्यसक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गोव्यातील हॉटेल व्यावसायिक गौरव आर्या याची दोन दिवस चौकशी केली असून, त्याचे मोबाइल फोन जप्त केले. सोमवारी व मंगळवारी त्याची बिलार्ड पियार्ड येथील कार्यालयात चौकशी झाली. त्याने रियाला भेटल्याचे मान्य केले. मात्र तिच्याशी ड्रग्जबाबत कसलेही चॅट, संभाषण किंवा व्यवहार झाला नसल्याचे सांगितले. रियाचे त्याबाबतच्या चॅटचे स्क्र ीनशॉट दाखविल्यानंतर त्याने माझ्याकडून फोन घेऊन अन्य कोणीतरी संभाषण केले असावे, असा दावा केला. तो चौकशीला सहकार्य करीत नाही. त्याने मोबाइल चॅट डीलीट केले आहेत. त्यामुळे त्याचा डिजिटल डाटा तपासण्यासाठी त्याचा मोबाइल जप्त केल्याचे अधिकाºयांनी सांगितले. दरम्यान, गौरवकडे एनसीबी लवकरच चौकशी करणार असल्याचे समजते.वरुण माथूरची ईडीकडून चौकशी : ईडीने बुधवारी सुशांतचा व्यावसायिक भागीदार असलेल्या दिल्लीतील वरुण माथूर याची सुशांतसोबतच्या व्यावसायिक व आर्थिक संबंधाबाबत रात्री उशिरापर्यंत चौकशी केली.

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतCrime Newsगुन्हेगारीCBIगुन्हा अन्वेषण विभागMumbaiमुंबई