शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात तब्बल ७,९९५ उमेदवार, सर्वच पक्षांत बंडखोरही भारंभार, १०,९०५ उमेदवारी अर्ज दाखल
2
घर फोडायचे पाप आई-वडिलांनी शिकवले नाही; शरद पवार यांची अजित पवार यांच्यावर टीका
3
आजचे राशीभविष्य: ७ राशींना आनंदी दिवस, लाभाचे योग; कार्यात यश, चांगली बातमी मिळेल
4
पोलिस-वकिलांमध्ये कोर्टातच हाणामारी; ११ वकील जखमी, पोलिस ठाण्याला आग
5
कुणाकडून कोण रिंगणात... घोळ मिटेना! जागावाटपाचा सस्पेन्स कायम; आता माघारीवर नेत्यांमध्ये होणार घमासान
6
आबांनी माझा केसाने गळा कापण्याचा प्रयत्न केला : अजित पवार
7
इस्रायलच्या हल्ल्यात गाझामध्ये ६० जण ठार; मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचे प्रमाण अधिक
8
कॅनडात टेस्ला कारचा अपघातामुळे स्फोट; नाशिकचा युवक ठार, डीएनएवरून पटली ओळख 
9
कोकण रेल्वेच्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल; १ नोव्हेंबरपासून होणार अमंलबजावणी
10
अयोध्येत ५५ घाटांवर २८ लाख दिवे लागणार, ऐतिहासिक दीपोत्सवाचा मोठा उत्साह
11
जर्मनी, जपानमध्ये आजही का होतात बॉम्बस्फोट?
12
फक्त गणना की जातगणना? सध्या औत्सुक्याचा विषय, पण उत्तर लवकरच मिळेल 
13
सरकारकडून लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न, प्रियांका गांधी यांचा प्रचारसभेत आरोप
14
भारत-चीन सैन्य मागे घेण्यास तयार, पूर्व लडाखमध्ये डेमचोक आणि डेपसांगवर तोडगा अंतिम टप्प्यात 
15
निदान कुलगुरुंना तरी राजकारणापासून दूर असू द्या !
16
ढोंगी लोकांच्या भुलाव्याला आपण का फसत गेलो?
17
नायजेरियन्सच्या ड्रग्ज पार्टीवर छापा, २६ लाख ७७ हजाराचे एमडी हस्तगत; २० नायजेरियनवर गुन्हा दाखल
18
हिवाळ्यात मुंबईतून रोज ९६४ विमानांच्या फेऱ्या
19
बी. फार्मसीच्या प्रवेशाला आचारसंहितेचा फटका, महाविद्यालयांची मान्यता प्रक्रिया रखडल्याने प्रक्रिया स्थगित
20
उलवेतून १ कोटीचे कोकेन हस्तगत, आफ्रिकन व्यक्तीला अटक

आरडीएक्सने स्फोट करून रेल्वे स्थानक उडवून देण्याची धमकी, सुरक्षा यंत्रणेत खळबळ

By नरेश डोंगरे | Published: October 30, 2024 5:02 AM

पोलीस नियंत्रण कक्षाच्या ११२ क्रमांकावर रविवारी पहाटे ३ च्या सुमारास एक फोन आला.

- नरेश डोंगरे

नागपूर : आरडीएक्सने स्फोट घडवून नागपूरचे रेल्वे स्थानक उडवून देण्याची एका आरोपीने धमकी दिली. यामुळे सुरक्षा यंत्रणांसह रेल्वे प्रशासनात प्रचंड खळबळ निर्माण झाली होती. पोलिसांनी या प्रकरणी धावपळ करून धमकी देणाऱ्या आरोपीच्या मुसक्या बांधल्या. बुद्धूराम असे त्याचे नाव असून तो अकोल्याचा रहिवासी आहे. पोलीस नियंत्रण कक्षाच्या ११२ क्रमांकावर रविवारी पहाटे ३ च्या सुमारास एक फोन आला.

आरडीएक्स पेरून नागपूरच्या रेल्वे स्थानकावर स्फोट घडविण्यात येणार असल्याची धमकी वजा माहिती फोन करणाऱ्या आरोपीने दिली. विशेष म्हणजे, पाकिस्तानी दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने दोन आठवड्यापूर्वीच रेल्वे गाड्यांमध्ये स्फोट घडविण्याची धमकी दिली होती. त्यामुळे या धमकीच्या फोनची सुरक्षा यंत्रणांनी गांभिर्याने दखल घेतली. लगेच रेल्वे पोलिसांना आणि रेल्वे सुरक्षा दलाला अलर्ट देण्यात आला. धमकीचा फोन ज्यावरून आला होता, त्या मोबाईल नंबरचे लोकेशन काढण्यात आले.

धमकी देणारा रेल्वे स्थानक परिसरातच असल्याचे त्यावरून लक्षात आल्याने आणखीच धाकधूक वाढली होती. दरम्यान, दिवाळीच्या निमित्ताने रेल्वे स्थानक आणि परिसरात प्रचंड गर्दी होती. मात्र, जीआरपीचे पोलीस निरीक्षक गाैरव गावंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी धमकी देणाऱ्या मोबाईल धारकाला शोधून काढले. तो दारूच्या नशेत टुन्न होता. त्याला पोलीस ठाण्यात आणून त्याची चांगलीच 'सरबराई' करण्यात आली. त्याने आपले नाव बुद्धुराम सांगितले. तो अकोल्याचा मुळ निवासी आहे. नागपुरातील एका हॉटेलमध्ये तो वेटर म्हणून काम करतो.

... म्हणून दिली बॉम्बस्फोटाची धमकीआरोपीची प्रदीर्घ चाैकशी करण्यात आली. त्याच्याकडे कोणतेही आक्षेपार्ह्य अथवा घातक साहित्य नव्हते. त्याच्या मोबाईलमधूनही संशयास्पद असे काही पोलिसांना मिळाले नाही. त्यामुळे त्याने बॉम्बस्फोटाची धमकी कोणत्या कारणामुळे दिली, त्याबाबत त्याला विचारणा करण्यात आली. बराच वेळ असंबंध्द उत्तरे दिल्यानंतर त्याने धमकी मागचे कारण स्पष्ट केले. धमकी देण्यापूर्वी तो रेल्वे स्थानक परिसरात संशयास्पद अवस्थेत दिसल्याने रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी त्याची चाैकशी केली. तो दारूच्या नशेत असून त्याच्याकडे रेल्वेचे तिकिटही नव्हते. तो विनातिकिट असल्याचे पाहून आरपीएफच्या जवानांनी त्याला फलाटावरून हाकलून लावले. तो अपमाण त्याच्या जिव्हारी लागला. त्याचमुळे त्याने ११२ क्रमांकावर फोन करून बॉम्बस्फोटाची धमकी दिल्याचे सांगितले. त्याच्या या कृत्यामुळे सुरक्षा यंत्रणांमध्ये काही काळ चांगलीच खळबळ निर्माण झाली होती. 

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरCrime Newsगुन्हेगारी