शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला', मल्लिकार्जुन खर्गेंच्या 'त्या' वक्तव्यावर PM मोदींचा घणाघात
2
अंधेरी पूर्वेत पंधरा ते वीस दुकानांना भीषण आग;कामगार अडकल्याची भीती, अग्निशमनच्या गाड्या दाखल
3
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलींग; 2 बिगर कश्मिरी मजुरांवर दहशतवाद्यांचा गोळीबार
4
पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांच्या पायाला दुखापत, दुबईत विमानातून उतरताना अपघात झाला
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: काटेवाडीत पाडवा का साजरा करणार? अजित पवारांनी कारणच सांगितलं, म्हणाले...
6
कॅनडामध्ये सुपरलॅबचा भंडाफोड, मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि शस्त्रे जप्त, भारतीय वंशाच्या व्यक्तीला अटक
7
३०० कंटेनरचे सामूदायिक लक्ष्मीपूजन; सांगवीच्या तरुणांकडे ४५० कंटेनरची मालकी
8
"बाळासाहेब असते तर थोबाड फोडलं असतं"; अरविंद सावंतांच्या वक्तव्यावर CM शिंदेंची प्रतिक्रिया
9
ऐन दिवाळीत मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी दोन्ही पवारांची धावाधाव
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगली विधानसभेत महाविकास आघाडीला धक्का! जयश्री पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम
11
Maharashtra Election 2024: नाशिक पूर्वमध्ये थेट सामना; अन्य तीन मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढत
12
Muhurat Trading : मुहूर्त ट्रेडिंगनंतर तेजीसह बाजार बंद, 'या' १० शेअर्समध्ये जोरदार खरेदी, गुंतवणूकदारांनी कमावले ४ लाख कोटी
13
Mumbai Crime: फटाके फोडण्याच्या वादातून तरुणाची हत्या, मुंबईतील धक्कादायक घटना
14
जरांगेंच्या यादीला ओबीसींची यादी तयार, जो तो उठतोय त्यांनाच भेटायला जातोय; लक्ष्मण हाकेंनी रणशिंग फुंकले
15
किंग कोहलीची 'विराट' चूक; मैदानात थांबण्यापेक्षा चोरटी धाव घेण्याच्या नादात फसला (VIDEO)
16
पोस्टर'वार'! योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला अखिलेश यादवांकडून पलटवार
17
भीषण! पाकिस्तानमध्ये मोठा बॉम्बस्फोट; ५ शाळकरी मुलं आणि एका पोलिसासह ७ जणांचा मृत्यू
18
'लॉरेन्स बिश्नोईने मला लवकर मारावे...', खासदार पप्पू यादव असं का म्हणाले?
19
IND vs NZ, 3rd Test Day 1 Stumps : फलंदाजांमुळे टीम इंडिया अडचणीत; ८६ धावांत गमावल्या ४ विकेट्स
20
"चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट, आजपर्यंत...!"; शंभूराज देसाई यांचा संजय राऊतांना टोला

चिकन चिलीला नकार, पत्नीला घराबाहेर हाकलले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 12:00 PM

तक्रारदार तरुणी विनया (नावात बदल) ही कांदिवलीच्या अशोकनगर परिसरात वृद्ध आई-वडिलांसोबत राहते.

मुंबई : पत्नीने चिकन चिली बनविण्यास नकार दिला. या रागात पतीने लॅपटॉप फोडून तिला घराबाहेर काढल्याचा प्रकार बोरिवलीमध्ये घडला. याप्रकरणी ३८ वर्षीय बीई (इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन) केलेल्या तरुणीने पोलिसांत धाव घेत पती आणि सासूविरोधात तक्रार दिली. याप्रकरणी मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार तरुणी विनया (नावात बदल) ही कांदिवलीच्या अशोकनगर परिसरात वृद्ध आई-वडिलांसोबत राहते. तसेच विलेपार्लेच्या खासगी टेक्नॉलॉजी कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करते. लोअर परळच्या तावडे विवाह मंडळ यांच्याकडून आलेल्या स्थळाशी तिचे कांदिवली पूर्वच्या ठाकूर हॉलमध्ये तिचे लग्न झाले. सुरुवातीला सर्व काही चांगले होते, मात्र नंतर दोघांच्यात खटके उडत होते. तसेच पैशाची मागणी करत होते.

दोघांमधील वाद मिटवण्यासाठी पतीपत्नीचे  दोघांमधील वाद मिटवण्यासाठी पती-पत्नीचे काउन्सिलिंग झाले. मात्र, त्या नंतरही पतीमध्ये काहीच फरक पडला नाही असे जबाबात तिने म्हटले आहे. तिच्या दोन्ही मुली सासरी आहेत, त्यामुळे अखेर १७ मे रोजी तिने बोरिवली पोलिसांत लेखी अर्ज दिला. त्यानुसार ४२ वर्षीय पती आणि ७० वर्षांच्या सासूने मानसिक व शारीरिक छळ करत स्त्रीधनाचा अपहार केल्याप्रकरणी पोलिसांनी २९ ऑगस्ट रोजी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. सुरुवातीला प्रत्येकी ८ हजार आणि नंतर २० हजार रुपये घरखर्चही तिने देण्यास सुरुवात केली. पहिली मुलगी झाल्यावर दुसरा चान्स घ्यावा लागेल, असा दबाव सासूने आणल्याने दुसऱ्या मुलीला जन्म दिला असा तिने आरोप केला आहे. दोन्ही मुलींच्या औषधोपचाराचा खर्चही तीच करत होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी