नालासोपारा - वसई विरार शहर महानगरपालिकेत कार्यरत असणाऱ्या दोन लिपिक महिलांना विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय कामात कर्तव्य बजावण्यासाठी नियुक्ती केली होती. पण त्या दोघी निवडणुकीच्या कामात हजर न राहता गैरहजर राहून कामात हलगर्जीपणा दाखवून पदीय कर्तव्याचा भंग केला म्हणून वसई तहसील कार्यालयातील अव्वल कारकून विकास भगवान चोरघे (50) यांनी नालासोपारा पोलीस ठाण्यात कायदेशीर तक्रार देऊन गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वसई विरार शहर महानगरपालिकेच्या लिपिक कोमल राणे आणि गीतांजली डाबरे या दोघींना निवडणूक कर्तव्यासंदर्भात हजर राहण्याचे केलेल्या आदेशाचे पालन न करता नोटीस बजावून देखील या दोघी निवडणुकीच्या कामकाजात हलगर्जीपणा करून पदीय कर्तव्याचा भंग करून 132 चे निवडणूक निर्णय अधिकारी यांची पूर्वपरवानगी न देता कोमल ह्या 18 सप्टेंबर 2019 ते आजपर्यंत आणि डाबरे ह्या 12 ऑक्टोबर 2019 ते आजपर्यंत परस्पर गैरहजर राहिल्या म्हणून कायदेशीर तक्रार देऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक विनायक माने हे करत आहे.
पालिकेच्या दोन महिला लिपिकांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2019 10:05 PM
नालासोपारा पोलीस ठाण्यात कायदेशीर तक्रार देऊन गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठळक मुद्देअव्वल कारकून विकास भगवान चोरघे (50) यांनी नालासोपारा पोलीस ठाण्यात कायदेशीर तक्रार देऊन गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक विनायक माने हे करत आहे.