शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंचीही पंकजा मुंडेंना साथ; दसरा मेळाव्याला हजर राहण्याची घोषणा करत म्हणाले...
2
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
3
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
4
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!
5
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
6
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
7
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
8
१२० मिनिटांचा थरार, समोर होता मृत्यू, पण वैमानिकानं दाखवलं प्रसंगावधान, असं उतरवलं विमान 
9
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
10
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
11
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
12
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
13
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
14
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
15
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
16
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
17
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
18
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
19
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
20
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी

ऑगस्टमध्ये कारागृहातून सुटला अन् पुन्हा घरफोड्या केल्याने पकडला 

By धीरज परब | Published: September 25, 2023 12:08 PM

मीरा गावठाणमधील साक्षी सावंत यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून ६५ हजारांचे दागिने १३ सप्टेंबर रोजी चोरीला गेले होते.

मीरारोड - विरार भागात तब्बल १४ चोऱ्या केल्याने पडलेला अट्टल घरफोड्या ऑगस्टमध्ये कारागृहातून सुटून येताच त्याने काशीमीरा भागात तीन घरफोड्यां केल्याने त्याला पोलिसांनी अटक केली आहे. 

मीरा गावठाणमधील साक्षी सावंत यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून ६५ हजारांचे दागिने १३ सप्टेंबर रोजी चोरीला गेले होते. या शिवाय घरफोड्यांचे होणारे गुन्हे पाहता या प्रकरणी पोलीस उपायुक्त जयंत बजबळे व सहायक आयुक्त महेश तरडे यांच्या मार्गदर्शनाखाली काशीमीराचे वरिष्ठ निरीक्षक संदीप कदम , निरीक्षक समीर शेख , सहायक निरीक्षक योगेश काळे , उपनिरीक्षक शिवाजी खाडे सह रमेश इगवे , अनिल पवार , प्रताप पाचुंदेमी अक्षय पाटील , राहुल सोनकांबळे , निलेश शिंदे , स्वप्नील मोहिले , सतीश निकम , रवी कांबळे , प्रवीण टोबरे , किरण वीरकर , राजेंद्र सूर्यवंशी  यांच्या पथकाने घरफोड्यांचा तपास चालवला होता. 

पोलिसांनी विविध भागातील सीसीटीव्ही  फुटेज तपासले असता त्यात एक संशियत दिसून आला होता . त्याची पडताळणी केली असता तो अट्टल घरफोड्या अक्रम फारुक अन्सारी ( २५ ) असल्याचे निषपन्न झाले . पोलिसांनी त्याला विरारच्या गोपचरपाडा भागातून पकडले . त्याच्या कडील चौकशीत काशीमीरा पोलीस ठाणे हद्दीत तीन घरफोड्या केल्याचे उघडकीस आले . त्याच्याकडून १ लाख ४० हजार किमतीचे सोन्याचे दागिने व कडी कोयंडा तोडण्यासाठी वापरत असलेला लोखंडी रॉड जप्त केला आहे. 

नशेसाठी घरफोड्या करणारा अक्रम हा तीन वर्ष कारागृहात होता . ऑक्टोबर २०२२ मध्ये कारागृहातून सुटून आल्यावर नोव्हेम्बर २०२२ ते जानेवारी २०२३ ह्या ३ महिन्यात अक्रम याने विरार परिसरात धुमाकूळ घालत तब्बल १४ घरफोड्या केल्या होत्या . याला विरार गुन्हे शाखा ३ चे प्रमोद बडाख व पथकाने जानेवारी २०२३ मध्ये अटक केली होती . ऑगस्ट २०२३ च्या पहिल्या आठवड्यात कारागृहातून बाहेर येताच पुन्हा घरफोड्या सुरु केल्या. 

टॅग्स :RobberyचोरीPoliceपोलिस