नवाज शरीफ यांना दिलासा; लाहोर हायकोर्टाने केला जामीन मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2019 06:47 PM2019-10-25T18:47:28+5:302019-10-25T18:51:03+5:30
प्रकृतीच्या कारणास्तव नवाज यांना हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे.
पाकिस्तान - चौधरी साखर कारखाना संबंधित हवाला आणि बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक राष्ट्रीय उत्तरदायित्व न्यायालयाने (नॅब) पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या कन्या मरियम नवाज यांना गजाआड केले होते. याप्रकरणी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची प्रकृती गंभीर आहे. नवाझ शरीफ यांना तुरूंगात असताना विष देण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांच्या मुलाने केला होता. याबाबतची माहिती डॉन वृत्तपत्राने दिली होती. लाहोर हायकोर्टाने नवाज शरीफ यांना जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
लाहोरस्थित कोटलखपत तुरुंगात कैद असलेले पिता नवाज शरीफ यांना भेटण्यासाठी आलेल्या ४५ वर्षीय मरियम नवाज यांना अटक करण्यात आली होती. भ्रष्टाचार प्रतिबंधक राष्ट्रीय उत्तरदायित्व न्यायालयाने (नॅब) त्यांना गजाआड केले. चौधरी साखर कारखान्यात मरियम नवाज या महत्त्वाच्या भागधारक आहेत. कोट्यवधी रुपयांची त्यांनी यात गुंतवणूक केली आहे. त्यांच्याद्वारे मोठ्या रकमेचे बरेच व्यवहार झाले आहेत. सध्या हे व्यवहार नॅबच्या रडारवर आले आहेत. नवाझ शरीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असून याप्रकरणी ते लाहोरमधील कोटलखपत तुरूंगात शिक्षा भोगत आहेत. गेल्या सोमवारी नवाझ शरीफ तरूंगात असताना प्रकृतीत बिघाड झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शरीरातील रक्तपेशी कमी झाल्याने नवाझ शरीफ यांची प्रकृती गंभीर झाली असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. प्रकृतीच्या कारणास्तव नवाज यांना हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे.
Pakistan: Lahore High Court has granted bail to former Pakistan Prime Minister Nawaz Sharif, on medical grounds, in the Chaudhry Sugar Mills case. (file pic) pic.twitter.com/Bk72ZnIiPw
— ANI (@ANI) October 25, 2019