ठळक मुद्देया भीषण आगीवर तटरक्षक दलाच्या विक्रम आणि सुजय या दोन जहाजांच्या मदतीने नियंत्रण मिळवता आलं. सुदैवाने या भीषण आगीत कोणीही जखमी झालेलं नाही.
कर्नाटक - सागर संपदा या संशोधकांच्या जहाजाला काल उशिरा रात्री अचानक आग लागली. या भीषण आगीवर तटरक्षक दलाच्या विक्रम आणि सुजय या दोन जहाजांच्या मदतीने नियंत्रण मिळवता आलं. सागर संपदा या जहाजामध्ये १६ शास्त्रज्ञ आणि ३६ क्रू मेम्बर्स होते. सर्वजण सुखरूप असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सागर संपदा जहाजाला लागलेली आग विजल्यानंतर जहाज मंगळुरु येथे बंदरावर नेण्यात आलं. हे जहाज समुद्री जीवांविषयी संशोधन करत असून त्यासाठीच ते रवाना करण्यात आलं होतं. ही आग कशामुळे आणि का लागली ? याची सखोल चौकशी तटरक्षक दल करत आहे. मात्र, सुदैवाने या भीषण आगीत कोणीही जखमी झालेलं नाही.