शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

घाटकोपरमध्ये रेस्टॉरंटला आग; एकाचा मृत्यू, दाेन जखमी, चार पोलिस घुसमटले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2022 9:08 AM

शेजारच्या रुग्णालयालाही झळ; २२ रुग्णांना राजावाडीला हलवले

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : करी रोडच्या वन अविघ्न पार्क टॉवरमधील फ्लॅटला आग लागल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी दुपारी घाटकोपरच्या एका पिझ्झा रेस्टॉरंटला भयावह आग लागली. त्यात एकाचा मृत्यू झाला असून दोघे जण जखमी झाले. धुरामुळे चार पोलिस घुसमटले. आगीची झळ शेजारच्याच पारेख रुग्णालयाला बसली असून येथील २२ रुग्णांना तत्काळ राजावाडी रुग्णालयात हलवण्यात आले.

घाटकोपर पूर्वेतील पंतनगर येथे ‘विश्वास’ ही सहा मजली इमारत असून तिच्या तळमजल्यावर जुनोस पिझ्झा रेस्टॉरंट आहे. दुपारी दोनच्या सुमारास इलेक्ट्रिक मीटर रूममध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली. काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले. त्यात रेस्टॉरंट जळून खाक झाले. धुराचे प्रचंड लोट उठत असल्याने तत्काळ इमारत रिकामी करण्यात आली. धुरामुळे परिसरातील काही जण गुदमरले. त्यांना तत्काळ राजावाडी आणि परळ येथील रुग्णालयात हलविण्यात आले. अग्निशमन दलाचे जवान येईपर्यंत पोलिसांनी बचावकार्य हाती घेतले व तेथील लोकांना बाहेर काढण्यासाठी मदत केली. ते करताना चार पोलिसही गुदमरले. 

त्यांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच अर्ध्या तासानंतर विक्रोळी आणि चेंबूर येथून अग्निशमन दलाच्या गाड्या बोलावण्यात आल्या. अग्निशमन विभागाच्या दहा गाड्यांच्या साहाय्याने तासाभरात आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. आग विझवल्यानंतरही धूर मात्र कायम होता.

मृत व्यक्ती : कुरेशी देढिया (४६)जखमी : तुकाराम घाग (४०)शेर बहादूर परिहार (४६)तानिया कांबळे (१८)कुलसुम शेख (२०)सना खान (३०)के. पी सुनार (४२)जखमी पोलिसजय यादव (५१)संजय तडवी (४०)नितीन विसावकर (३५)प्रभू स्वामी (३८)

रुग्णांची घुसमट, डॉक्टरांची धावपळ...घाटकोपर रेल्वेस्थानक परिसरातील खोकानी लेन येथे पारेख हे मल्टिस्पेशालिटी रुग्णालय आहे. आगीची झळ रुग्णालयाला बसून धूर पसरल्याने रुग्णांची धुसमट होऊ लागली. हॉस्पिटल प्रशासनाने ऑपरेशन थिएटरमधील रुग्णासह २२ रुग्णांना अन्यत्र हलवले.

सनराईज हॉस्पिटल दुर्घटनेची आठवण२७ एप्रिल २०२१ साली भांडुपच्या ड्रीम्स मॉलमधील सनराईज हॉस्पिटलला आग लागली होती. या आगीत १० जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. ११ तासांनी ती आग आटोक्यात आणण्यात आली होती. त्या घटनेची आठवण यावेळी अनेकांना आली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfireआग