शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

कायद्याच्या परीक्षेला न बसताही पास झाले निवृत्त सहायक पोलीस आयुक्त; प्रकरणाचे गूढ वाढले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2020 3:56 AM

सेंट विल्फ्रेड कॉलेजमधील प्रकार, बाबाजी भोर हे विद्यार्थी मुंबई येथे सहायक पोलीस आयुक्त (एसीपी) होते. या प्रकरणी मुंबई विद्यापीठाने या प्रकरणात लक्ष घालून चौकशी समिती नेमण्याची मागणी केली जात आहे.

मयूर तांबडे 

नवीन पनवेल : येथील शेडुंगजवळील सेंट विल्फ्रेड विधी महाविद्यालयामध्ये २०१२पासून एलएलबीचे शिक्षण दिले जाते. कायद्याच्या परीक्षेला बसलेले नसतानाही दोन्ही परीक्षेतील आठ पेपरमध्ये पास करण्यात आलेला विद्यार्थी निवृत्त सहायक पोलीस आयुक्त (एसीपी) निघाले आहेत. एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला कायद्याच्या परीक्षेत पास करण्यात आल्याने या प्रकरणाचे गूढ वाढले आहे.परीक्षेला बसलेले नसतानाही एलएलबी सेमिस्टर ३ एटीकेटी आणि एलएलबी सेमिस्टर ४ या दोन्ही परीक्षांच्या आठ पेपरला पास केल्याप्रकरणी सेंट विल्फ्रेड विधी महाविद्यालयातील दोघांवर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. मे २०१९ रोजी दिलेल्या अर्जानुसार तब्बल सोळा महिन्यांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाल्याने तक्रारदार सागर कांबळे यांनी समाधान व्यक्त केले आहे.

बाबाजी भोर हे विद्यार्थी मुंबई येथे सहायक पोलीस आयुक्त (एसीपी) होते. या प्रकरणी मुंबई विद्यापीठाने या प्रकरणात लक्ष घालून चौकशी समिती नेमण्याची मागणी केली जात आहे. बाबाजी भोर यांनी २०१६-१७ मध्ये या सेंट विल्फ्रेड विधी महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला होता. भोर हे नियमित महाविद्यालयामध्ये येत नव्हते. नियमाप्रमाणे परीक्षेला बसण्यासाठी ७० टक्के हजेरी आवश्यक असते. या परीक्षेला न बसताही बाबाजी भोर यांना हजेरीपटात खाडाखोड करून पास करण्यात आले.

टॅग्स :Policeपोलिसexamपरीक्षा