पुणे : दारु पिण्यास विरोध करणाऱ्या पत्नीवर रिव्हॉल्वरमधून गोळीबार करुन तिच्या खुनाचा प्रयत्न करणाºया बीएसएफच्या निवृत्त जवानाला बंडगार्डन पोलिसांनीअटक केली आहे़.बालाजी रंगनाथ चाथे (वय ४६, रा़ सरस्वती कृपा सोसायटी, ताडीवाला रोड) असे या जवानाचे नाव आहे़ या घटनेत त्यांच्या पत्नी कडूबाई बालाजी चाथे (वय ४२) जखमी झाल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालाजी चाथे हे बीएसएफमध्ये जवान म्हणून कामाला होते़. सध्या ते निवृत्त झाले असून एका ठिकाणी बॉडी गार्ड म्हणून काम पाहत होते़. त्यांना दारु पिण्याचे व्यसन आहे़. पत्नी व मुलगा त्यांना दारु पिण्यापासून परावृत्त करत होते़. शुक्रवारी दुपारी १ वाजता ते घरी आले़. त्यावेळी घरात पत्नी व त्यांचा मुलगा योगेश (वय २३) हे घरात होते़. बालाजी यांनी आल्या आल्या दारु पिण्यास सुरुवात केली़. तेव्हा पत्नी कडूबाई व मुलगा योगेश यांनी त्यांना दारु पिऊ नका असे सांगितले़. तेव्हा दारुच्या नशेत बालाजी यांनी कमरेचे पिस्तुल काढत पत्नीच्या दिशेने गोळी झाडली़. गोळी खेटून गेल्याने कडुबाई जखमी झाल्या़. गोळीबार केल्यानंतर बालाजी पळून गेले होते़ .याप्रकरणी त्यांचा मुलगा योगेश चाथे याने फिर्याद दिली आहे़. पोलीस उपायुक्त बच्चन सिंह, वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम. एम. मुजावर यांनी घटनास्थळी भेट दिली. बंडगार्डन पोलिसांनी बालाजी चाथे यांना अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक एऩ जे़ घाग तपास करत आहेत.
दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पत्नीवर निवृत्त बीएसएफ जवानाचा गोळीबार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2018 3:08 PM
दारु पिण्यास विरोध करणाऱ्या पत्नीवर रिव्हॉल्वरमधून गोळीबार करुन तिच्या खुनाचा प्रयत्न करणाºया बीएसएफच्या निवृत्त जवानाला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे़.
ठळक मुद्देसध्या ते निवृत्त झाले असून एका ठिकाणी बॉडी गार्ड म्हणून काम पाहत दारुच्या नशेत पिस्तुल काढत पत्नीच्या दिशेने गोळी झाडली़