मोबाईलवर ब्लॉक केल्याचा घेतला बदला, अश्लील फोटो सोशल मीडियावर केले व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 08:54 PM2022-01-12T20:54:58+5:302022-01-12T21:07:07+5:30
Crime News : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या वडिलांना एका गावातील रहिवाशाने संपर्क साधला ज्याने त्यांना सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मुलीच्या अश्लील फोटोंबद्दल माहिती दिली.
मध्य प्रदेशातील भोपाळच्या हद्दीतील नझीराबाद पोलिस स्टेशन परिसरात १७ वर्षीय तरुणीवर बलात्कार आणि ब्लॅकमेल केल्याप्रकरणी २६ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी आणि पीडित तरुणी एकाच गावातील रहिवासी आहेत आणि 11 वीत शिकणाऱ्या मुलीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याचं समोर आल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या वडिलांना एका गावातील रहिवाशाने संपर्क साधला ज्याने त्यांना सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मुलीच्या अश्लील फोटोंबद्दल माहिती दिली. त्यानंतर पीडितेच्या वडिलांनी फिर्याद दिली. कौटुंबिक धार्मिक स्थळाच्या सहलीदरम्यान आरोपीने तिच्याशी मैत्री केल्याचा आरोप पीडितेने केला आहे.
गेल्या वर्षी 16 एप्रिल रोजी आरोपीने पीडितेच्या घरात घुसून तिच्यावर बलात्कार केला. त्याने काही अश्लील फोटोही क्लिक केले आणि पीडितेकडून लैंगिक संबंधाची मागणी करायला सुरुवात केली,” असे नझीराबादचे एसएचओ बीपी सिंग यांनी सांगितले. पीडितेने तिच्या मोबाईलवर आरोपीचा नंबर ब्लॉक केला आणि त्याला भेटण्यास नकार दिला आणि बदला म्हणून त्याने तिचे अश्लील फोटो व्हायरल करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी बलात्कार आणि ब्लॅकमेलचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार असून त्याला अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.