दिल्लीतील जहांगीरपुरी भागात एका अल्पवयीन मुलाने वडिलांना झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी, एका तरुणावर गोळी झाडल्याची खळबळजनक घटना घडली आहे. घटनेच्या वेळी जखमी मुलगा पार्कजवळ बसला होता. यावेळी तीन अल्पवयीन मुलं तेथे आले आणि त्यांतील एकाने त्याच्यावर गोळी झाडली व तेथून पळ काढला. गोळी जखमी तरुणाच्या डोळ्यावर लागली आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी 5.15 वाजताच्या सुमारास जहांगीरपुरी पोलीस ठाण्यात पीसीआर कॉल आला. यावर, एका व्यक्तीला गोळी लागल्याचे सांगण्यात आले. पीडित व्यक्तीचे नाव जावेद असे आहे. तो जहांगीरपुरीमधील एच-4 ब्लॉकमध्ये राहतो. माहिती मिळताच पोलिसांचा चमू तत्काळ घटनास्थळी पोहोचला. जखमी तरुणाला सुरुवातील बीजेआरएम रुग्णालयात आणण्या आले. यानंतर अधिक चांगल्या उपचारांसाठी त्याला उच्च केंद्रात पाठवण्यात आले आहे.
चेहऱ्यावर गोळी मारून पळाले अल्पवयीन -यासंदर्भात चौकसी केली असता, एच-4 ब्लॉकमध्ये रहणाऱ्या अंसार अहमद यांच्या 36 वर्षीय मुलगा जावेदच्या उजव्या डोळ्यावर गोळी लागली आहे. पीडित तरुणाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी 4.45 वाजताच्या सुमारास, तो एच-3 ब्लॉकमध्ये पार्कजवळ बसलेला होता. याच वेळी त्याच्या ओळखीचे तीन अल्पवयीन मुले तेथे आले. त्यातील एकाने त्याच्या चेहऱ्यावर गोळी झाडली आणि सर्व जण तेथून पळून गेले.
वडिलांना झालेल्या मारहाणीचा बदला - याप्रकरणी जहांगीरपुरी पोलिसांनी आयपीसीच्या कलम 307 नुसार, गुन्हा दाखल केला आहे. तसेच विशेष स्टाफने 4 सीसीएलला अटकही केली असून गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेले देशी पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. याशीवाय जखमी तरुणाने जवळपास सात महिन्यांपूर्वी पकडण्यात आलेल्या एका अल्पवयीन मुलाच्या वडिलांना मारहाण केली होती आणि आज हे सर्वजण त्याचा बदला घेण्यासाठी आले होते, असा खुलासाही त्यांनी केला आहे.