रहाटणी : रहाटणी येथील नखाते नगरच्या समोर जनता स्टील सेंटरमध्ये अनाधिकृत पुणे घरगुती सिलेंडर रिफिलिंग करून त्याची विक्री करत असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली. गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास या दुकानावर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून त्यात ३६ लेंडर जप्त केले. दुपारी बाराच्या सुमारास जनता स्टील सेंटर या भांडे विक्री करणाऱ्या दुकानात विविध कंपन्यांचे घरगुती सिलेंडर काळाबाजार आणि घेऊन चार किलोचे सिलेंडर भरून ते ग्राहकांना विकण्याचा व्यवसाय करत होते. यात विविध कंपनीचे भरलेले सिलेंडर यावेळी आढळून आले. यात हिंदुस्तान पेट्रोलियम या कंपनीचे दोन सिलेंडर भारत पेट्रोलियमचे चार सिलेंडर खाजगी कंपनीचा एक सिलेंडर तसेच भारत पेट्रोलियमचे चार किलो चे नऊ सिलेंडर यावेळी आढळून आले. हा सर्व मुद्देमाल महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊन त्याचा पंचनामा करून वाकड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. ही कारवाई नायब तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. जनता स्टील सेंटर या दुकानदाराला चार किलो सिलेंडर भरण्यासाठी एका खाजगी गॅस सप्लाय करणाऱ्या एजन्सीने सिलेंडर २० सिलेंडर भरलेला टेम्पो आणून तो खाली करत असल्याचे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्याने ही कारवाई केली जात असल्याचे अधिकारी सांगत आहेत.
रहाटणी येथे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून ३६ सिलेंडर केले जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 4:25 PM