मुंबई - अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूच्या प्रकरणात ड्रग कनेक्शन उघडकीस आल्यानंतर चौकशीदरम्यान एनसीबी कारवाई करत आहे. शुक्रवारी रियाच्या राहत्या घरी आणि सॅम्युअलच्या अंधेरी येथील घरावर एनसीबीने छापेमारी केली. यानंतर शोविक आणि सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअलला एनसीबीच्या मुंबई कार्यालयात आणण्यात आले, जिथे त्यांची चौकशी केली. यावेळी सॅम्युअल मिरांडा याने अधिकाऱ्यांना सुशांतसाठी ड्रग्ज खरेदी करत असल्याचे सांगितले. अखेर शोविक आणि मिरांडा यांना NDPS Act अंतर्गत एनसीबीकडून अटक करण्यात आली आहे. सुशांत सिंग राजपूत प्रकरणात ही पहिलीच अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
रिया आणि शोविकच्या अडचणीत वाढ होत असतानाच त्यांचे वडील रिटायर्ड लेफ्टनंट कर्नल इंद्रजीत चक्रवर्ती यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "अभिनंदन इंडिया...तुमच्यामुळे माझ्या मुलाला अटक झाली" असं म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या सर्व प्रकारामुळे त्यांना धक्का बसला आहे. सोशल मीडियावर त्यांच्या नावाने एक संदेश जोरदार व्हायरल झाला असून त्यात त्यांनी शोविकच्या अटकेनंतर प्रतिक्रिया दिल्याचं म्हटलं जात आहे.
रियाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता
"अभिनंदन इंडिया...तुमच्यामुळे माझ्या मुलाला अटक झाली. नक्कीच या रांगेत पुढचा नंबर माझ्या मुलीचा असेल. त्यानंतर माहीत नाही आणखी कोण कोण असेल. तुम्ही एक मध्यमवर्गीय कुटुंब उद्ध्वस्त केलं आहे. मात्र न्यायासाठी सर्व योग्य आहे. जय हिंद!" असा मेसेज असून त्याखाली इंद्रजीत चक्रवर्ती यांचं नाव देण्यात आलं आहे. ट्विटरवर अनेकांनी हा मेसेज शेअर केला आहे. शोविकनंतर एनसीबी रियाला ताब्यात घेण्याची शक्यता आहे. शोविक, मिरांडा यांनी सुशांतला नशेशी लत लावून अमली पदार्थ पुरवल्याचे पुरावे एनसीबीच्या हाती लागले आहेत.
शोविक आणि सॅम्युअलला 9 सप्टेंबरपर्यंत NCBची कोठडी
शोविक आणि सॅम्युअलच्या अटकेमुळे सुशांतच्या मृत्यूनंतर दोन महिने चौकशी करणाऱ्या मुंबई पोलिसांना अमली पदार्थाबाबतचे माहिती का मिळू शकली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शोविक आणि सॅम्युअल या दोघांना नऊ सप्टेंबरपर्यंत एनसीबीची कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान अंमली पदार्थविरोधी पथकाचे अधिकारी शोविक आणि सॅम्युअल मिरांडाला कोर्टात आणण्याआधी सायन रूग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले होते. या दोघांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
"गंभीर आजाराच्या रुग्णांना रेल्वे प्रवासाची परवानगी द्या", अमित ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
विकृतीचा कळस! 3 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार आणि हत्या, 20 दिवसांतील तिसरी घटना
बापरे! मुलाचा मृतदेह घेण्यासाठी रात्रभर रुग्णालयाबाहेर पावसात भिजण्याची कुटुंबीयांवर आली वेळ
Amazon वरुन मागवला 1.40 लाखांचा कॅमेरा पण आल्या चपला आणि दगड, ऑनलाईन खरेदीत अजब भानगड