शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
5
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
6
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
7
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
8
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
9
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
10
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
11
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
12
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
13
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
14
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
15
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
16
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
17
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
18
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
19
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
20
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?

काळ्या बाजारात नेताना भाताचा ट्रक पकडला, २५० गोण्या केल्या जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2019 2:02 AM

अंबाडी - वज्रेश्वरी रस्त्यावर श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सरकारने भरडाईसाठी हमी भावात खरेदी केलेल्या भाताचा ट्रक काळ््याबाजारात नेत असताना गुरु वारी सायंकाळी पकडला.

वज्रेश्वरी : अंबाडी - वज्रेश्वरी रस्त्यावर श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सरकारने भरडाईसाठी हमी भावात खरेदी केलेल्या भाताचा ट्रक काळ््याबाजारात नेत असताना गुरु वारी सायंकाळी पकडला. यात २५० भाताच्या गोण्या आढळल्या. काही महिन्यांपूर्वी श्रमजीवीच्या कार्यकर्त्यांनी शहापूर येथे कर्नाटक येथून बेकायदा येणारा तांदूळ पकडला होता.पालघर ते गोंदिया असे तब्बल २५० ते ३०० रूपये प्रती क्विंटल वाहतूक भत्ता घेऊन हा भात उचलला जातो. मात्र गोंदिया येथे भरडाईसाठी न नेता हा भात काळ््याबाजारात किंवा अहमदाबादमध्ये व्यापाऱ्यांना विकला जात असल्याची माहिती श्रमजीवी संघटनेचे युवक जिल्हाप्रमुख प्रमोद पवार आणि कार्यकर्त्यांना मिळाली होती. त्यानुसार भात पकडण्यात आला. गोंदिया येथील मुकेश जैन यालाही गणेशपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सरकार खरेदी करत असलेल्या एक ते सव्वा लाख टन भाताच्या या वाहतुकीत सरकारची १० ते १२ कोटींची लूट करून हा भात काळ््याबाजारात विकून गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले आहे.महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ स्थानिक शेतकऱ्यांकडून हमी भावाने भात खरेदी करत असते. हा भात भरडाईसाठी मिलमध्ये देऊन त्याची भरडाई करून तांदळाचा रास्त भाव दुकानात पुरवठा केला जातो. हे काम देताना स्थानिक मिलला प्राधान्य देण्याचे सरकारी निर्णयात नमूद केले आहे. याप्रमाणे दोन स्थानिक मिलला आम्ही १०० टक्के मिलिंग करण्यास तयार असल्याची हमी देणारे पत्रही महामंडळाकडे दिले आहे. असे असताना रक्कम खर्च करून हा भात गोंदिया, भंडारा, रायगड येथील मिलला देण्यात येतो. हा खरेदी केलेला भात काळाबाजारात विकला जातो आणि मग त्या बदल्यात तांदूळ देताना कर्नाटक किंवा आंध्र प्रदेश येथून जुना स्वस्त तांदूळ आणून दिला जातो.गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरूपकडलेला ट्रक गणेशपुरी पोलिसांच्या ताब्यात दिला असून पुढील तपास आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रि या सहायक पोलीस निरीक्षक महेश सागडे आणि पोलीस उपनिरीक्षक रवींद्र आव्हाड करत आहेत. याबाबत श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांना माहिती दिली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणे