मुंबई : लालबाग वीणा जैन हत्या प्रकरणात पोलिसांकडून रिम्पलच्या प्रियकराकडेही चौकशी सुरू आहे. तिने त्यालाही अंधारात ठेवल्याची माहिती समोर येत आहे. तसेच, टप्प्याटप्प्याने तिने आईचे तुकडे केल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत.
रिम्पलच्या संपर्कात असलेल्या नातेवाइका व्यक्तिरिक्त ५ ते ६ जणांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. यामध्ये तिच्या प्रियकराकडेही पोलिस तपास करत आहे. गेल्यावर्षी ऑक्टोबरपासून त्यांच्यात प्रेमसंबंध आहेत, अशी माहिती त्याच्या चौकशीत समोर येत आहे.
घरातून वास येत असल्याबाबत त्याने रिम्पलला विचारताच बाथरूममध्ये चोकअप झाले असून कामगाराला बोलावून घेतले असल्याचे त्याला सांगत होती. तसेच, त्यालाही घरात घेत नसल्याचीही माहिती पोलिस सूत्रांकडून समजते आहे. याबाबत काळाचौकी पोलिस अधिक तपास करत आहेत.
आज कोर्टात उपस्थिती२७ डिसेंबरला वीणा या पहिल्या मजल्यावरून पडल्या. त्याच दिवशी त्यांचा मृत्यू झाला. नातेवाईक आपल्याला दोषी समजतील या भीतीने तिने त्या दिवसापासूनच मृतदेहाचे तुकडे करण्यास सुरुवात केली. तिने तीन ते चार टप्प्यांत मृतदेहाचे तुकडे केल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, रिम्पलची पोलिस कोठडी उद्या, २० मार्च रोजी समाप्त होणार असून तिला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.