मुंबई : उत्तेजक पदार्थ बाळगल्याप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविकसह एकूण सहा जणांविरुद्ध अमली पदार्थ नियंत्रक कक्षाने (एनसीबी) गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, रियाचा गोव्यातील एका हॉटेल उद्योजकाशी संपर्क असल्याचे आढळून आले आहे. वागातोर येथे झालेल्या रेव्ह पार्टीत अमली पदार्थांच्या पुरवठ्याचे गूढही याच प्रकरणाशी जोडले जात आहे.
रिया, शोविकसह गोव्यातील ड्रग्ज तस्कर गौरव आर्य, अभिनेता सुशांतसिंह राजपूतची माजी व्यावसायिक व्यवस्थापक श्रुती मोदी व जया सहा यांना आरोपी बनविण्यात आले आहे. रियाच्या मोबाइलमध्ये व्हॉट्सअॅप चॅटमधून ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर याची माहिती ईडीने एनसीबीला दिली होती. त्यानुसार, ही कारवाई करण्यात आली. सर्व सहा जणांवर अमली पदार्थ आणि मानसरोगविषयक कलम २० (बी) २८, २९ ही कलमे लावण्यात आली आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी एनसीबीचे एक पथक मुंबईत, तर एक पथक गोव्यात दाखल झाल्याचे सूत्रांनी सांगितले. ईडीने जप्त केलेल्या रियाच्या मोबाइलच्या तपासातून अनेक बाबी समोर आल्या. सुशांत काही वर्षांपासून अमली पदार्थांचे सेवन करीत होता.आज ताब्यात घेतले जाऊ शकतेसीबीआयने गुरुवारी मुख्य संशयित, सुशांतची मैत्रीण अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिचा भाऊ शोविक चक्रवर्तीसह पाच जणांची कसून चौकशी केली. रियाविरुद्ध सबळ पुरावे मिळाल्याने तिला शुक्रवारी ताब्यात घेतले जाऊ शकते, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.