अकोला - सोन्याचे बिस्कीट विक्री असल्याचे सांगून सदर सोने स्वस्तात देण्याचे आमीष देउन रोकड घेउन येणाऱ्या खरेदीदाराला लुटणाºया आंतरराज्यीय टोळीला जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमूख हर्षराज अळसपुरे यांनी रविवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास आळशी प्लॉट येथून जेरबंद केले. या टोळीतील पाच जन गुजरातमधील सुरत येथील असून तीन जन अमरावती, जळगाव नंदुरबार येथील असल्याची माहिती समोर आली आहे.खदान पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खंडेलवाल शोरुमजवळ सोन्याचे आमीष देउन लुटमार करणारी टोळी असल्याची माहिती विशेष पथकाचे प्रमूख हर्षराज अळसपुरे यांना मिळाली. त्यांनी या टोळीवर पाळत ठेऊन गुजरातमधील सुरत जिल्हयातील विठोबा नगर लिंबाई येथील रहिवासी भिका साहेबराव पाटील, सुरत जिल्हयातील पांढकेश्वर येथील रहिवासी भानुदास जगन्नाथ ढोडे, सुरत जिल्हयातील गोडदरा येथील रहिवासी राजकुमार टीकाराम नागपात्रे, सुरत येथील एकता नगर सोसायटीमधील जयेश किशोर सेंदाने, सुरतमधील गडोदरा नेर येथील रविंद्र गोरख पाटील, नंदुरबार येथील रविंद्र प्रकाश नायस्कर, जळगाव खांदेश जिल्हयातील उटखोडा येथील राजु गुलाब पाटील या सात जनांना ताब्यात घेतले. तर अमरावती येथील रहिवासी निसारभाई फरार होण्यात यशस्वी झाला. या टोळीकडून तलवार, धारदार शस्त्र,रोख सहा हजार रुपये, ७ मोबाईल व एक तवेरा कंपनीचे चारचाकी वाहन असा एकून सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यांच्याविरुध्द खदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्वस्तात सोन्याचे आमीष देउन लुटमार करणारी टोळी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 6:35 PM