दक्षिण मुंबईतील काळाचौकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ज्वेलर्सच्या दुकानाला दरोडेखोरांनी लक्ष्य केले आणि दुकान लुटले. या दरोड्यात दरोडेखोरांनी तब्बल २ कोटी ८२ लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरले आहे आणि जाता जाता त्यांनी मागे एकही पुरावा सोडला नाही. दरोडेखोरांनी अशा पद्धतीने चोरी केल्यामुळे काळाचौकी पोलिसांना या दरोडेखोरांचा माग काढणं हे मोठं आव्हान आहे.
काळाचौकी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आंबेवाडी परिसरातील मंगल ज्वेलर्सवर दरोड्यांनी दरोडा टाकला. या दरोड्यात दरोडेखोरांनी तब्बल २ कोटी ८२ लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले आहे. तसेच पोलिसांना एकही पुरावा सोडला नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दरोडेखोरांनी दरोडा टाकण्याअगोदर मंगल ज्वेलर्सची रेकी केली. त्यानुसार मध्यरात्रीच्या सुमारास दरोडेखोरांनी मंगल ज्वेलर्सच्या बाहेरील रस्त्यावर बेस्टच्या विजेच्या खांब्यांवरील वीज कट केली आणि ब्लॅकआऊट केला. जेणेकरून अंधारात चोरट्यांनी ओळख पटणार नाही. नंतर कटरच्या सहाय्याने शटरचे लाॅक तोडून दरोडेखोर दुकानात शिरले. दुकानातील सर्व दागिन्यांची लूट करून या दरोडेखोरांनी आपली चोरी पकडली जाऊ नये याकरता दुकानातील सीसीटीव्ही फुटेज सेव्ह केली जाते ती डीव्हीआर (DVR) मशीनच चोरांनी चोरुन नेली. त्यामुळे नेमक्या किती जणांनी ज्वेलर्सवर दरोडा टाकला, नेमकी घटना कशी घडली याबाबत पोलिसांना प्रश्न निर्माण झाला आहे.
दरोडा टाळता आला असता जर...
या ज्वेलर्स दुकानावर पडलेला दरोडा टाळता आला असता. जर ज्वेलर्स मालकाने दुकानाच्या लाॅकला अथवा आजूबाजूला थेफ्ट अलार्म लावला असता तर, तसेच सर्वांत महत्वाचे म्हणजे सीसीटीव्ही कॅमेरे मोबाईलशी कनेक्ट नव्हते. तसेच डीव्हीआर मशीन व्यतिरिक्त क्लाऊडबेसमध्ये सीसीटीव्ही फुटेज सेव्ह करण्याचे ॲापशन ज्वेलर्स मालकाने ठेवले पाहिजे. ज्वेलर्स मालकांनी जर या सर्व गोष्टी पाळल्या नाही, तर याचा फायदा दरोडेखोर घेतात आणि करोडोंची लूट करतात.