लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - कोरोनाचे संकट आणि महागाई मुळे आधीच सर्वसामान्य नागरिक दिवाळी कशीबशी साजरी करत असताना भाईंदरमध्ये एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे १ लाख ९० हजारांचे गंठण बळजबरी खेचून दोघे लुटारू पळून गेल्याची घटना घडली आहे.
सण असल्याने रश्मी अभय कासवकर ह्या गुरुवारी रात्री ८ . ३० च्या सुमारास पतीसह मिठाई खरेदी करून गीता नगर मध्ये राहणाऱ्या सासू - सासऱ्यांच्या घरी ९० फुटी मार्गावरून पायी चालत जात होते . त्यावेळी मागून दुचाकी वरून आलेल्या दोघां पैकी मागे बसलेल्या इसमाने रश्मी यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण खेचून पळून गेले .
या प्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात रश्मी यांच्या फिर्यादीवरून त्यांच्या गळ्यातील डोण्याचे ६ तोळे वजनाचे १ लाख ९० हजारांचे गंठण लुटून नेल्या बद्दल दोघा अनोळखी दुचाकीस्वारां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . ऐन सणासुदीच्या दिवसात लुटारू मोकाट फिरून लूटमार करत असल्याने नागरिकां मध्ये भीतीचे वातावरण आहे .