शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
3
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
4
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
5
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
6
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
7
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
8
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
9
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
10
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
11
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
12
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
13
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
14
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
15
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
16
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
17
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
18
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
19
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

लासलगावी पेट्रोल पंपावर दरोडा; चाकूचा धाक दाखवत केली लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2023 10:05 AM

पेट्रोल पंप मॅनेजर दिपेश यांनी सांगितले की, ते रात्री साडेदहा वाजेचे सुमारास पेट्रोलपंप बंद करुन मेन ऑफिस मध्ये  झालेल्या जमा खर्चा बाबत सेल्समन बंडु व प्रितम यांचे कडुन हिशोब घेत होते.

- शेखर देसाई

लासलगाव (नाशिक) :  भरवस फाटा येथील साई बाबा पेट्रोल पंपावर शुक्रवारी (दि. २१) रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास सोपान निवृत्ती जगताप, रा. मरळगोई ता. निफाड व त्याचे ४ अनोळखी साथीदारांनी  ऑफिसमध्ये बळजबरीने घुसुन चाकुचा धाक दाखवून सेल्समन बंडु मोरे यास मारहाण केली.  तेथील साहित्याचे नुकसान करुन २६००० रुपये रोख व डीव्हीआर काढून नेत दरोडा टाकल्याची  घटना घडली आहे.

याबाबत लासलगाव  पोलीस कार्यालयात  मधुकर शामसिंग पाडवी मुळ रा. खटवाणी ता.  अक्कलकुवा जि. नंदुरबार, हल्ली रा. पांडुरंगनगर विंचुर, ता. निफाड यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, निफाड तालुक्यातील भरवस फाटा  येथे  २००६ पासून साईबाबा पेट्रोल पंप  आहे. हा पेट्रोल पंप चालवण्यासाठी मॅनेजर म्हणुन दिपेश वसंत वळवी, रा. अक्कलकुवा ता. अक्कलकुवा जि. नंदुरबार व सेल्स मन म्हणून बंडु साहेबराव मोरे, रा. कानळद ता. निफाड, व प्रितम मगन पाडवी, रा. अक्कलकुवा ता. अक्कलकुवा जि. नंदुरबार असे कामासाठी ठेवलेले आहेत. दिनांक २१ जुलै रोजी माझे घरी विंचूर येथे मी झोपलेलो असतांना रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास  पेट्रोलपंपावर काम करणारे मॅनेजर दिपेश वसंत वळवी, बंडु साहेबराव मोरे, व प्रितम मगन पाडवी माझे घरी आले. तेव्हा ते  घाबरलेले दिसत होते.

पेट्रोल पंप मॅनेजर दिपेश यांनी सांगितले की, ते रात्री साडेदहा वाजेचे सुमारास पेट्रोलपंप बंद करुन मेन ऑफिस मध्ये  झालेल्या जमा खर्चा बाबत सेल्समन बंडु व प्रितम यांचे कडुन हिशोब घेत होते. तेव्हा कोणीतरी ऑफिसचे शटर वाजवले, म्हणुन त्यांनी शटर उघडले असता एक इसम जबरदस्तीने ऑफिस मध्ये घुसला, त्याचे पाठोपाठ इतर ४ इसम ऑफिस मध्ये घुसले. तेव्हा त्यातील एक इसमास दिपेश व बंडु यांनी ओळखले, तो मरळगोई येथील राहणार सोपान निवृत्ती जगताप होता. त्यातील एकाने बंडुला हाताने मारुन ऑफिस मधील खुर्ची त्याचे डोक्यात मारली व त्याचे खिशातील चाकू काढून बंडुचे पोटाला लावला. तसेच सोपान जगताप याने त्याचे खिशातून चाकू काढून दिपेशला चाकूचा धाक दाखवला. त्याचे कडील कॅश काउंटरची चावी हिसकावून घेतली. व त्यात ठेवलेले रोख रक्कम २६३००/- रुपये काढुन घेतले. त्या नंतर त्यातील दोन इसमांनी पेट्रोल अॅटो मशिनचे मॉनीटर उचलून जोरात खाली आपटुन फोडले व काउंटरवर ठेवलेले पैसे मोजायचे मशिन उचलून खाली जमिनीवर आपटुन फोडुन नुकसान केले.

सोपान जागताप आणि त्यासोबत असलेले इतर ४ इसमांनी ऑफिसचे शेजारी असलेल्या रूम मध्ये जावून रुम मधील सीसीटीव्ही कॅमे-यांचे डीव्हीआर बॉक्सच्या वायरी चाकुने कापुन डीव्हीआर मशीन सोबत घेवुन तुम्ही जर कोणाला काही सांगितले तर तुम्हाला मारुन टाकु ” असा दम सोपान जगताप याने देवून त्यांचे कडील दोन मोटारसायकल घेवुन येवला बाजुकडे पळुन गेले,  मॅनेजर दिपेश वसंत वळवी यांनी सांगितले, तेव्हा  तात्काळ माझे डोंगरगाव येथील मित्र गोरख काशिनाथ नागरे व प्रशांत विनायक फड यांना झालेला प्रकार फोनवर कळवून पंपावर येण्यास सांगितले. त्यानंतर मालक, मॅनेजर, सेल्समन असे चौघे परत माझे पेट्रोलपंपावर गेलो. तेव्हा  माझे मित्र गोरख काशिनाथ नागरे व प्रशांत विनायक फड असे देखील तेथे आले. आम्ही सर्वांनी तेथील परिस्थिती पाहिली. सोपान जगताप याने ८ महिण्यापूर्वी ही माझे पंपावर काम करणारा निलेश पगारे रा. कांनलद ता. निफाड याचे सोबत वाद घालुन त्यास मारहाण केलेली होती व दिनांक ०२ जुलै रोजी ही माझे पंपावर काम करणारा बंडु मोरे याने पेट्रोल टाकण्यासाठी लाईनीत ये असे सांगीतल्याचा राग येवुन त्याला शिवीगाळ दमदाटी केली होती परंतु तेव्हा आम्ही घाबरलेलो. सोपान निवृत्ती जगताप हा गुन्हेगारी वृत्तीचा असुन त्याची लासलगाव भरवस फाटा परीसरात प्रचंड दहशत असुन त्याने अनेक गुन्हे केल्याचे मला माहित आहे. पण त्याचे विरुद्ध शक्यतो कोणीही तक्रार देत नाही असे फिर्यादीत म्हंटले आहे.

टॅग्स :RobberyचोरीNashikनाशिक