पुसेसावळी: खटाव तालुक्यातील वडगाव (ज.स्वा) येथे मध्यरात्रीच्या सुमारास सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅकेच्या(शाखा वडगाव) साईडच्या बाजुला असणार्या खिडकीचे ग्रिल तोडून चोरट्यांनीबँकेत प्रवेश केला.परंतु तिजोरी न तुटल्यामुळे रोख रक्कम व ऐवज जैसे थे असल्यामुळे बॅक अधिकारी व ठेवीदारांचा जीव भांडयात पडला आहे. तरी रात्री एक ते दिडच्या सुमारास जिल्हा मध्यवर्ती बँकेत प्रवेश करुन सी.सी.टिव्हीचे कॅमेरे बंद करुन तिजोरी फोडण्याचा प्रयत्न करित होते. परंतु बॅकेतील भोग्याचा आवाज आल्यामुळे व संबधित अधिकार्यांनी मोबाइल द्वारे मेसेज गेल्यामुळे गावातील ग्रामस्थ बॅकेजवळ आले. त्यामुळे चोरट्यांना गावातील ग्रामस्थ जागे झाले असल्याचा सुगावा लागल्यामुळे चोरटे तिजोरी न फोडता पसार झाले. ग्रामस्थांच्या जागृतीमुळे चोराचा चोरीचा बेत फसला असल्याची चर्चा घटनास्थळी होती.
तरी या बॅकेशी निगडित असणार्या शेतकरी व ठेवीदारांचे धाबे दणाणले आहेत. शेतकर्यांशी निगडित असणारी ही बँक असलेमुळे सर्व शेतकर्यांचे या बँकेशी आर्थिक व्यवहार होत असतात. तरी अनेक शेतकर्यांची ऊसाची बिलेही या बँकेत जमा झालेली आहेत. त्यात गावात बॅक असलेने सर्व आर्थिक व्यवहारासाठी सोयीचे असल्यामुळे ग्राहक शेतकरी वर्गाचे या बँकेत आपले पैसे ठेवलेले आहेत. तरी या पडलेल्या दरोडयामुळे येथील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे. पोलीस प्रशासना बरोबर बँक प्रशानाकडूनही सुरक्षेच्या दृष्टीने सतर्क राहणे गरजेचे आहे.तरी ग्रामीण भागातील शाखांमध्ये बँक प्रशासनाने सुरक्षारक्षक नेमणे ही काळाची गरज आहे.तरी घटनास्थळी औंध पोलीस स्टेशनचे अधिकारी दाखल झाले होते. या दरोडयांचा उलगडा पोलीसांनी लवकरात लवकर करावा असे ग्रामस्थांकडून बोलले जात आहे.