शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

मुंबईत चोरीचे प्रमाण दुप्पटीने वाढले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 3:32 PM

सहा वर्षात 45 कोटी 69 लाख 50 हजार 582 रुपये किंमतीच्या चोरी; पोलिसांना फक्त 16 कोटी 75 लाख 46 हजार 295 रुपये किंमतीच्या मालमत्ता हस्तगत

ठळक मुद्दे मुंबईत 949 कोटी रुपये खर्च करुन सहा हजार सीसीटीव्ही कॅमरे 2016 मध्ये लावण्यात आले आहेत. मुंबई पोलीस विभागाकडे  2013 पासून 2018 पर्यंत मुंबईत किती जबरी चोरीच्या गुन्ह्याची नोंद झाली आहेशकील अहमद शेख यांना दिलेल्या माहितीवरून मुंबईत जबरी चोरीचे प्रमाण दुपट्टीने वाढले असल्याचं स्पष्ट होत आहे.  

मुंबई - मुंबईला सर्वात जास्त सुरक्षित शहर मानले जाते. मुंबईत सुरक्षिततेच्या दृष्टीने मुंबईत 949 कोटी रुपये खर्च करुन सहा हजार सीसीटीव्ही कॅमरे 2016 मध्ये लावण्यात आले आहेत. तरीसुद्धा गुन्हयात कोणत्याही प्रकारची विशेष कमी आली नाही. कारण गेल्या सहा वर्षात 45 कोटी 69 लाख 50 हजार 582 रुपये इतकी किंमतीच्या मालमत्ता किंवा रोख जबरी चोरी झाली आहे, अशी माहिती आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांना मुंबई पोलिसांनी दिली आहे.

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई पोलीस विभागाकडे  2013 पासून 2018 पर्यंत मुंबईत किती जबरी चोरीच्या गुन्ह्याची नोंद झाली आहे. तसेच, किती गुन्ह्याची उघड झाली आहे आणि किती किंमतीच्या मालमत्ता किंवा रोख चोरी झाली आहे. तसेच पोलिसांनी किती किंमतीच्या मालमत्ता किंवा रोख हस्तगत केले आहे याबाबत माहिती विचारली होती. त्यानुसार मुंबई पोलीस गुन्हे शाखेचे शासकीय माहिती अधिकरी तथा सहाय्यक पोलीस आयुक्त (प्रतिबंधक) रमेश गावित यांनी शकील अहमद शेख यांना दिलेल्या माहितीवरून मुंबईत जबरी चोरीचे प्रमाण दुपट्टीने वाढले असल्याचं स्पष्ट होत आहे.  

माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीप्रमाणे मुंबईत जानेवरी 2013 पासून  डिसेंबर 2018 पर्यंत एकूण 4674 जबरी चोरीचे गुन्ह्यांची नोंद झाली असून एकूण 45 कोटी 69 लाख 50 हजार 582 रुपये इतकी किंमतीच्या मालमत्ता किंवा रोख जबरी चोरी झाली आहे. तरी पोलिसांनी फक्त 16 कोटी 75 लाख 46 हजार 295 रुपये किंमतीच्या मालमत्ता हस्तगत केले आहेत.  म्हणजे फक्त 37 टक्के मालमत्ता किंवा रोख हस्तगत केले आहेत. 

2013 मध्ये एकूण 2925 घरफोडीच्या गुन्ह्यात 555304754/- रुपये किंमतीच्या मालमत्ता किंवा रोख घरफोडीत चोरी झाले असून फक्त 82979967/- रुपये किंमतीच्या मालमत्ता किंवा रोख हस्तगत झाले आहेत. तसेच 2014  मध्ये एकूण 3055  घरफोडीच्या गुन्ह्यात 600157791 रुपये  किंमतीच्या मालमत्ता किंवा रोख घरफोडीत चोरी झाले असून फक्त 90855413/- रुपये किंमतीच्या मालमत्ता किंवा रोख हस्तगत झाले आहेत. तसेच 2015  मध्ये एकूण 3010  घरफोडीच्या गुन्ह्यात 661103303/- रुपये  किंमतीच्या मालमत्ता किंवा रोख घरफोडीत चोरी झाले असून फक्त 138490424/- रुपये किंमतीच्या मालमत्ता किंवा रोख हस्तगत झाले आहेत. तसेच 2016  मध्ये एकूण 2552 घरफोडीच्या गुन्ह्यात 432848922/- रुपये किंमतीच्या मालमत्ता किंवा रोख घरफोडीत चोरी झाले असून फक्त 69039772/- रुपये किंमतीच्या मालमत्ता किंवा रोख हस्तगत झाले आहेत.

वर्षाप्रमाणे मुंबईत किती गुन्ह्यांची नोंद आणि किती गुन्ह्यांची उकल 

2013 मध्ये एकूण 679 जबरीचोरीचे घटनेत 94414474/- रुपये किंमतीच्या मालमत्ता किंवा रोख चोरी झाले असून फक्त 506 गुन्हे उघड झाले आहे तसेच 19043859/- इतकी किंमतीच्या मालमत्ता किंवा रोख परत मिळाली आहेत. 

2014 मध्ये एकूण 697 जबरीचोरीचे घटनेत 91586774/- रुपये किंमतीच्या मालमत्ता किंवा रोख चोरी झाले असून फक्त 511 गुन्हे उघड झाले आहे तसेच 25961107/- इतकी किंमतीच्या मालमत्ता किंवा रोख मिळाली आहेत.  

2015 मध्ये एकूण 794 जबरीचोरीचे घटनेत 106320593/- रुपये किंमतीच्या मालमत्ता किंवा रोख चोरी झाले असून फक्त 570 गुन्हे उघड झाले आहे तसेच 37998947/- इतकी किंमतीच्या मालमत्ता किंवा रोख मिळाली आहेत.   

2016 मध्ये एकूण 723 जबरीचोरीचे घटनेत 48395458/- रुपये किंमतीच्या मालमत्ता किंवा रोख चोरी झाले असून फक्त 536 गुन्हे उघड झाले आहे तसेच 15475245/- इतकी किंमतीच्या मालमत्ता किंवा रोख मिळाली आहेत.   

2017 मध्ये एकूण 850 जबरीचोरीचे घटनेत 45788983/- रुपये किंमतीच्या मालमत्ता किंवा रोख चोरी झाले असून फक्त 671 गुन्हे उघड झाले आहे तसेच 23566736/- इतकी किंमतीच्या मालमत्ता किंवा रोख मिळाली आहेत.   

2018 मध्ये एकूण 931 जबरीचोरीचे घटनेत 70444300/- रुपये किंमतीच्या मालमत्ता किंवा रोख चोरी झाले असून फक्त 828 गुन्हे उघड झाले आहे तसेच 45500401/- इतकी किंमतीच्या मालमत्ता किंवा रोख मिळाली आहेत.   

तसेच उपनगरीय रेल्वे हद्दीत 1 जानेवरी 2013 पासून डिसेंबर  2018 पर्यंत एकूण 3168 जबरी चोरीचे गुन्हे नोंद झाले आहे. घटना झाली असून एकूण छहा वर्षात 6 कोटी, 96 लाख, 47 हजार, 767 रुपये इतकी किंमतीच्या मालमत्ता किंवा रोख चोरी झाले आहे. तसेच फक्त 3 कोटी  64 लाख 68 हजार 542 रुपये इतकी किंमतीच्या मालमत्ता किंवा रोख मिळाले आहेत. म्हणजे फक्त 50 टक्के मालमत्ता किंवा रोख मिळाले आहेत. 

वर्षाप्रमाणे उपनगरीय रेल्वे हद्दीत गुन्ह्यांची नोंद

2013 मध्ये एकूण 513 जबरी चोरीचे घटनेत 14717904/- रुपये किंमतीच्या मालमत्ता किंवा रोख चोरी झाले असून फक्त 338 गुन्हे उघड झाले आहे तसेच 6021418/- इतकी किंमतीच्या मालमत्ता किंवा रोख मिळाली आहेत.   

2014 मध्ये एकूण 573 जबरी चोरीचे घटनेत 16601474/- रुपये किंमतीच्या मालमत्ता किंवा रोख चोरी झाले असून फक्त 344 गुन्हे उघड झाले आहे तसेच 6700810/- इतकी किंमतीच्या मालमत्ता किंवा रोख मिळाली आहेत.   

2015 मध्ये एकूण 531 जबरी चोरीचे घटनेत 14688251/- रुपये किंमतीच्या मालमत्ता किंवा रोख चोरी झाले असून फक्त 329 गुन्हे उघड झाले आहे तसेच 6119685/- इतकी किंमतीच्या मालमत्ता किंवा रोख मिळाली आहेत.   

2016 मध्ये एकूण 61 जबरी चोरीचे घटनेत 1390149/- रुपये किंमतीच्या मालमत्ता किंवा रोख चोरी झाले असून फक्त 50 गुन्हे उघड झाले आहे तसेच 771980/- इतकी किंमतीच्या मालमत्ता किंवा रोख मिळाली आहेत.   

2017 मध्ये एकूण 496 जबरी चोरीचे घटनेत 8504010/- रुपये किंमतीच्या मालमत्ता किंवा रोख चोरी झाले असून फक्त 457 गुन्हे उघड झाले आहे तसेच 6234316/- इतकी किंमतीच्या मालमत्ता किंवा रोख मिळाली आहेत.   

2018 मध्ये एकूण 994 जबरी चोरीचे घटनेत 13745979/- रुपये किंमतीच्या मालमत्ता किंवा रोख चोरी झाले असून फक्त 932 गुन्हे उघड झाले आहे तसेच 10620333/- इतकी किंमतीच्या मालमत्ता किंवा रोख मिळाली आहेत.   

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांच्या मते मुंबईच्या लोकांच्या सुरक्षेसाठी पोलीस विभागाला अजूनही ठोस पाऊल उचलण्याची आवश्यकता आहे. तसेच २४ तास मॅन्युअली सीसीटीव्हींवर नजर ठेवण्यासाठी कर्मचारी / अधिकारी नियुक्त करणं गरजेचं आहे.  

 

टॅग्स :RobberyदरोडाPoliceपोलिसMumbaiमुंबई