शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
3
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
4
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
5
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
6
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
7
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
8
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

गावात दरोडा; महिलेच्या गळ्यावर सुरा ठेवत अंगावरील दागिने लुटले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2022 10:04 PM

खोणी गावातील वकील अजय विष्णू पाटील यांच्या घरावर दरोडेखोरांनी दरोडा टाकला आहे

भिवंडी : ( दि. २ ) शहरालगत असलेल्या खोणी गावात मध्यरात्रीच्या सुमारास एका घरावर सशस्त्र पाच दरोडेखोरांनी दरोडा टाकला असल्याची खळबळजनक घटना बुधवारी घडली आहे. चोरट्यांनी खोलीत झोपलेल्या वयस्क महिलेच्या गळ्यावर सूरा ठेवत तिच्या अंगावरील दागिने खेचून चोरटे पळून गेले आहेत. मात्र सिसिटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे कैद झाले असून पोलीस या दरोडेखोरांचा तपास करीत आहेत.           खोणी गावातील वकील अजय विष्णू पाटील यांच्या घरावर दरोडेखोरांनी दरोडा टाकला आहे. रात्री अजय हे पत्नी व मुला सह एका खोलीत तर त्यांची आई नंदाबाई व सहा वर्षांची मुलगी ही दुसऱ्या खोलीत झोपले होते. रात्री तीन वाजताच्या सुमारास आलेल्या पाच दरोडेखोरांनी प्रथम अजय पाटील यांच्या कार्यालयाची कडी कोयंडा तोडून कार्यालयात प्रवेश केला परंतु तेथे काही मिळून न आल्याने दरोडेखोरांनी आपला मोर्चा पहिल्या मजला वरील घराकडे वळवला. तेथील दरवाजाची आतील कडी कशाच्या तरी मदतीने उचकटून आई नंदाबाई झोपलेल्या खोलीत ते शिरले व त्यांच्या गळ्यावर सुरा ठेवत कानातील कर्णफुले खेचून काढली त्यामुळे कानाच्या पाळ्या मधून रक्त वाहू लागले. गळ्यातील गंठन व हातातील बांगड्या हिसकावून घेत असताना महिलेला मला मारू नका तुम्हाला काय न्यायचे ते न्या अशी आर्जव नंदाबाई यांनी केली .त्याच वेळी त्यांची सून उठल्याने व तिने घरात काही व्यक्ती आल्याचे पाहून जोरजोरात आरडाओरड केल्याने परीसरातील नागरीक जागे झाल्याने दरोडेखोरांनी पलायन केले.           दरम्यान परिसरातील युवकांनी दरोडेखोरांचा पाठलाग केला असता दरोडेखोराने त्यांच्या सोबत रस्सी मध्ये बांधून आणलेले दगड ग्रामस्थांवर भिरकावीत पलायन केले .भयभीत कुटुंबीयांनी स्थानिक नागरिक अरुण पाटील यांच्यासोबत निजामपुरा पोलिसांना घटनेची माहिती दिली असता रात्र गस्त करीत असलेले दोन पोलीस काही वेळाने पाहणी करून सकाळी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी येण्याचा सल्ला देत निघून गेले .या मुळे अजय पाटील, अरुण पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे . या दरोड्या मध्ये महिलेच्या अंगावरील किमान नऊ तोळे सोने चोरट्यांनी चोरून नेले असून निजामपुरा पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणेbhiwandiभिवंडीPoliceपोलिस