राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई पोलीस दलाचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची भूमिका संशयास्पद असल्याचे म्हटले आहे. दररोज वर्तमान पत्रात आणि टिव्ही चॅनेलच्या माध्यमातून परमबीर सिंग यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे नवनविन आरोप आता समोर येत आहे असे देखील देशमुख प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना नागपुरात म्हणाले.
'त्या' याचिकेवर तातडीने सुनावणीची गरज नाही; परमबीर सिंग यांना हायकोर्टाचा झटका
तसेच पुढे अनिल देशमुख यांनी मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जिलेटीन ठेवण्याचे प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझे व मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची भूमिका संशयास्पद असल्याच्या अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. सचिन वाझे आणि परमबिर सिंग यांच्या गंभीर चुका होत्या आणि त्या माफ करण्यालायक नव्हत्या. त्या अक्षम्य अशा चुका होत्या. त्याचा तपास NIA करीत आहे म्हणून मी त्यांची मुंबई आयुक्त पदावरुन बदली केली होती. तसेच एका कार्यक्रात या संदर्भातचे मी जाहीर वक्तव्य सुध्दा केले होते. त्या आकसापोटी सिंग यांची बदली केल्यानंतर त्यांनी माझ्यावर खोटे आरोप केले. ३० वर्षाच्या राजकीय जीवनात माझ्यावर एक सुध्दा आरोप नाही. परमबीर सिंग यांच्या खोटया आरोपावरुन माझ्यावर जो CBI ने गुन्हा दाखल केला आहे, त्यावर न्याय मागण्यासाठी मी उच्च न्यायालयात दाद मागत याचिका दाखल केली आहे.