पिंपरी : लग्नाचे आमिष दाखवून तीन वर्षांपासून वारंवार अत्याचार केला. तसेच आरोपीने अहमदनगर येथे स्वत:च्या घरी नेऊन तरुणीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत तिच्यावर अत्याचार केला. ही घटना शनिवारी (दि. १४) काष्टी, अहमदनगर येथे घडली. याप्रकरणी २२ वर्षीय पीडित तरुणीने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दीपक रवींद्र तारे (वय २४, रा. काष्टी, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दीपक याने फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखवले. तीन वर्षांपासून चिंचवड येथे तिच्यावर वारंवार अत्याचार केला. तसेच संदीप याने १४ सप्टेंबर या दिवशी फिर्यादीला फसूवन काष्टी येथे स्वत:च्या घरी नेले. तिथे तिला मारहाण केली. तसेच तलवारीने जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला.
लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 7:00 PM