(Image Credit : guyanachronicle.com)
चोरीच्या कितीतरी विचित्र घटना आपण रोज वाचत-ऐकत असतो. कुठे चोरांच्या हाती मोठं घबाड लागलं तर कुठे चोरांना पोलिसांच्या तावडीत सापडून जेरबंद व्हावं लागतं. कधी कधी तर चोरांच्या हाती असं काही लागतं ज्याची त्यांनी कल्पनाही केली नसते. अशीच एक घटना यूपीच्या हापुडमधून समोर आली आहे. इथे एका ठेकेदाराच्या घरातून पोत्यात भरून ठेवलेले २२ लाख रूपये चोराने लंपास केल्याची माहिती आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.
ठेकेदाराने दिलेल्या तक्रारीवरून पोलीस प्रकरणाची चौकशी करत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, विजेच्या ठेकेदाराने मालाचं पेमेंट करण्यासाठी २२ लाख रूपये आणले होते आणि ते त्याने स्टोररूममध्ये एका पोत्यात लपवून ठेवले होते. मिळालेल्या माहितीनुसार ठेकेदार मनोज चौधरी सर्वोदय नगर कॉलनीमध्ये आपल्या परिवारासोबत राहतो. (हे पण वाचा : GST असिस्टंट कमिशनरच्या फ्लॅटमध्ये झाली चोरी; दोघांना अटक)
त्याने सांगितले की, गुरूवारी मालाचं पेमेंट करण्यासाठी २२ लााख रूपये त्याने मित्रांकडून जमा करून घरात ठेवले होते. सुरक्षेच्या दृष्टीने त्याने त्याने हे पैसे एका पोत्यात भरून स्टोररूममध्ये लपवून ठेवले होते.
ठेकेदाराने सांगितले की शुक्रवारी सकाळी तो जेव्हा पेमेंट देण्यासाठी पैसे काढायला स्टोररूमध्ये गेला तर त्याला तिथे पैशांनी भरलेलं पोतं काही दिसलं नाही. पैशांचं पोतं गायब झाल्याचं समजताच घरात एकच गोंधळ उडाला. त्यांनी जेव्हा घरातील सीसीटीव्ह कॅमेरा चेक केला तर त्यांना एक मास्क लावलेली व्यक्ती घराच्या छतावर चालताना दिसली. लगेच त्यांनी याची माहिती पोलिसात दिली. पोलीस चोराचा शोध घेत आहेत.