शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकींची गाेळ्या झाडून हत्या; ३ गोळ्या लागल्या, दोघे ताब्यात
2
मला हलक्यात घेऊ नका, मी पळणारा नाही तर पळवणारा; विधानसभेवर पुन्हा महायुतीचा भगवाच फडकणार - CM शिंदे
3
दोन महिने थांबा, सत्तेत येतोय; कोणालाही सोडणार नाही...; दसरा मेळाव्यात ठाकरेंचे मुख्यमंत्री म्हणूनच ‘प्रोजेक्शन’
4
अंतराळातून टेहळणीसाठी भारत प्रक्षेपित करणार तब्बल ५२ उपग्रह; पाकिस्तान-चीनच्या हालचालींवर ठेवणार करडी नजर
5
दसऱ्याच्या दिवशी ईडीची छापेमारी, रांचीत खळबळ
6
जातीच्या आधारावर संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न; विजयादशमी उत्सवात डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केली चिंता 
7
वेड्यावाकड्या युती अन्‌ आघाड्यांना धडा शिकवा; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आवाहन
8
बांगलादेशमध्ये दुर्गापूजेशी संबंधित ३५ अनुचित घटना, भारताची तीव्र शब्दांत नाराजी
9
पाक-चीन संबंध बिघडविण्यासाठीच ‘ताे’ बाॅम्बस्फाेट
10
गरज पडेल तेव्हा शक्तिनिशी शस्त्रांचा वापर : संरक्षणमंत्री
11
बागमती एक्स्प्रेस दुर्घटना बालासोरसारखीच!
12
ओटीटी कंटेंटवर हवे नियंत्रण, कायदा करा; सिंगल यूज प्लॅस्टिक नको - सरसंघचालक 
13
मागास, वंचितांना त्रास देणाऱ्यांचा हिशेब घेणार; पंकजा मुंडे कडाडल्या; धनंजय मुंडे पहिल्यांदाच दसरा मेळाव्यास हजर
14
या समाजाचा अपमान केला तर उलथवून टाकू; जरांगेंनी दंड थोपटले; नारायणगडावर विराट जनसमुदाय
15
दीक्षाभूमीवर निनादला क्रांतीचा नारा ‘जय भीम’; समतेची मशाल घेत देश-विदेशातून दाखल झाला जनसागर
16
केवळ चौकशी नको, आता पायउतार व्हा; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर शरद पवार आक्रमक!
17
Baba Siddique: राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या; घटनेनं राज्यभर खळबळ
18
१५ दिवसांपूर्वी धमकी अन् Y दर्जाच्या सुरक्षेतही बाबा सिद्दिकींची हत्या; मुंबईतील रस्त्यावर नेमकं काय घडलं?
19
टीम इंडियाची 'विजया दशमी'! दहाव्यांदा प्रतिस्पर्धी संघाला क्लीन स्वीप देत जिंकली मालिका

जैश ए मोहम्मदच्या टार्गेटवर संघ मुख्यालय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2022 12:28 PM

इंडियन मुजाहिदीन, लष्कर- ए- तोयबासारख्या दहशतवादी संघटनांच्या टार्गेटवर अनेक वर्षांपासून संघ मुख्यालय आहे. २००६ मध्ये पाकिस्तानी अतिरेक्यांनी मोठ्या प्रमाणात स्फोटक भरलेली ॲम्बेसिडर कार घेऊन मुख्यालयावर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला होता.

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपुरातील संघ मुख्यालयावर हल्ला करण्याचा कट सहा महिन्यांपासून पाकिस्तानात शिजत असून, दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदने आपल्या स्लीपरमार्फत नागपुरातील संघ मुख्यालयाची रेकीही करून घेतली आहे. रेकी करणारा जैशचा स्लीपर काश्मिरात पकडला गेला. त्याच्या चौकशीतून ही खळबळजनक माहिती पुढे आली आहे.

इंडियन मुजाहिदीन, लष्कर- ए- तोयबासारख्या दहशतवादी संघटनांच्या टार्गेटवर अनेक वर्षांपासून संघ मुख्यालय आहे. २००६ मध्ये पाकिस्तानी अतिरेक्यांनी मोठ्या प्रमाणात स्फोटक भरलेली ॲम्बेसिडर कार घेऊन मुख्यालयावर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र, तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांनी तो हल्ला उधळून लावला होता. त्यावेळी पाकिस्तानी दहशतवाद्यांना पोलिसांनी कंठस्नानही घातले होते. या हल्ल्यानंतर संघ मुख्यालय, नागपूर रेल्वेस्थानक, दीक्षाभूमी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ दहशतवाद्यांच्या टार्गेटवर असल्याचे वृत्त अनेकदा पुढे आले होते.

या पार्श्वभूमीवर संघ मुख्यालय परिसरात केंद्रीय सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली. येथे २४ तास सीआयएसएफचे सशस्त्र जवान तैनात असतात. संघ मुख्यालयाची सुरक्षाव्यवस्था कडेकोट करण्यात आल्यामुळे गेल्या काही वर्षांत कसल्याही प्रकारची अनुचित घटना अथवा इशारा मिळाला नव्हता. मात्र, काही दिवसांपूर्वी श्रीनगर (काश्मीर)मध्ये तेथील सुरक्षा दलाने जैश ए मोहम्मदच्या एका स्लीपरला अटक केली. त्याच्या चौकशीतून, सप्टेंबर २०२१ मध्ये तो नागपुरात आला होता आणि त्याने संघ मुख्यालय, रेशीमबागचे स्मृती मंदिर, तसेच परिसरातील व्हिडिओ आणि छायाचित्र काढल्याचे कबूल केले. ही माहिती केंद्रीय गृहमंत्रालय, तसेच केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनी नागपूर पोलिसांना दिल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकाराची पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी गंभीर दखल घेत प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेचे उपायुक्त चिन्मय पंडित यांच्याकडे सोपविला आहे. दरम्यान, गुन्हे शाखेचे एक पथक काश्मीरमध्ये जाऊन आले असून, त्यांनी स्लीपरकडून करण्यात आलेल्या रेकीसंबंधीची सविस्तर माहिती घेतली आहे. आयुक्तांनी दोन दिवसांपूर्वी संघ मुख्यालय, रेशीमबाग परिसरात जाऊन तेथील सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेतला आणि आजूबाजूच्या परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त नेमला.

कोतवालीत गुन्हा दाखल

पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी पत्रकारांशी बोलताना जैशच्या दहशतवाद्यांनी नागपुरात संघ मुख्यालयाची रेकी केली असून, आम्ही त्यासंबंधाने कोतवाली ठाण्यात अन लॉ फुल ॲक्टिव्हिटिज ॲक्टनुसार गुन्हा दाखल केल्याचे सांगितले आहे. प्रकरण अतिशय संवेदनशील असल्यामुळे यासंबंधाने सविस्तर बोलता येणार नसल्याचे आयुक्तांनी म्हटले.

शहर पोलीस अलर्ट मोडवर

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय, तसेच सभोवतालच्या परिसरात फोटोग्राफी/व्हिडिओग्राफी तसेच ड्रोनद्वारे चित्रीकरण करण्यास नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाकडून बंदी घातली आहे. फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ कलम १४४ (१,३) प्रमाणे हे प्रतिबंध लावण्यात आले आहेत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

टॅग्स :RSS Headquartersराष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालय