केरळमध्ये RSS नेत्याची तलवारीने हत्या; परिसरात खळबळ 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2022 06:19 PM2022-04-16T18:19:39+5:302022-04-16T18:20:59+5:30

RSS Leader : श्रीनिवासन यांच्यावर शनिवारी दुपारी हल्लेखोरांनी तलवार आणि इतर शस्त्रांनी हल्ला केला. 

rss leader killed by gang in palakkad kerala multiple sword attacks | केरळमध्ये RSS नेत्याची तलवारीने हत्या; परिसरात खळबळ 

केरळमध्ये RSS नेत्याची तलवारीने हत्या; परिसरात खळबळ 

Next

केरळमधील पलक्कड येथे एका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) नेत्याची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. श्रीनिवासन असे या नेत्याचे नाव आहे. श्रीनिवासन यांच्यावर शनिवारी दुपारी हल्लेखोरांनी तलवार आणि इतर शस्त्रांनी हल्ला केला. 

श्रीनिवासन यांचे पलक्कड एसके मोटर्स नावाचे दुकान आहे. आज दुपारी ते दुकानावर असताना दुचाकीवरून आलेल्या पाच हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर जखमी अवस्थेत त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथे त्याचा मृत्यू झाला.हल्लेखोरांच्या हातात कुऱ्हाडी होत्या आणि श्रीनिवासन यांच्या अंगावर जखमा होत्या, असे प्रत्यक्षदर्शी वासुदेवन यांनी सांगितले. 

प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार,  हल्लेखोर पाच जण होते. ते तीन वाहनांतून घटनास्थळी पोहोचले आणि दुकानात घुसले आणि श्रीनिवासन यांच्यावर निर्दयीपणे हल्ला केला. त्याच्यावर चाकूने वार करण्यात आले असून त्याच्या शरीरावर अनेक जखमा आहेत. 

या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून प्रत्यक्षदर्शींची चौकशी सुरू आहे. दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. श्रीनिवासन हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शारीरिक शिक्षण विभागाचे माजी प्रमुख होते.

या घटनेच्या काही तासांपूर्वी येथील जवळच्या गावात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) नेत्याची हत्या झाल्याची घटना समोर आली होती. शुक्रवारी दुपारी मशिदीत नमाज अदा करून घरी परतत असताना जिल्ह्यातील एलापल्ली येथे 43 वर्षीय सुबैर यांची हत्या करण्यात आली. 

दरम्यान, आरएसएस नेत्यावरील हल्ल्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना, भाजपने आरोप केला की, पीएफआयची राजकीय शाखा सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (एसडीपीआय) श्रीनिवासन यांच्या हत्येमागे आहे.

Web Title: rss leader killed by gang in palakkad kerala multiple sword attacks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.