नवी दिल्ली - बुधवारी हजारो कोटींच्या बँकांचे कर्ज घेऊन भारतातून पळून गेलेल्या फरार मद्यसम्राट, उद्योजक विजय मल्ल्याच्या संबंधात मोठी बातमी समोर येत आहे. ब्रिटन कोणत्याही वेळी विजय मल्ल्यालाभारतात पाठवू शकेल अशी माहिती समोर आली आहे. बुधवारी रात्रीच त्यांचे विमान मुंबईत उतरणार असल्याचे बोलले जात होते. परंतु आता अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) या वृत्ताचे खंडन करत मल्ल्या कोणत्याही क्षणी भारतात येण्याबाबतची माहिती नाकारली आहे. अशी माहिती टाईम्स ऑफ इंडियाने दिली आहे. ईडीने म्हटले आहे की, ही चुकीची बातमी आहे. अजून या प्रक्रियेस थोडा वेळ लागू शकेल. मल्ल्या मुंबईत येताच वैद्यकीय पथक त्याच्या प्रकृतीची तपासणी करेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय) आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) चे काही अधिकारी मल्ल्याबरोबर विमानात असतील. दिवसा मल्ल्या भारतात आल्यास त्याला विमानतळावरून थेट कोर्टात नेण्यात येईल. सीबीआय आणि ईडी दोन्ही एजन्सी न्यायालयात त्याचा रिमांड मागतील, असे सूत्रांनी सांगितले. विजय मल्ल्याचे वकील आनंद दुबे यांना याबाबत खुलासा करण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. तसेच व्हॉट्स अॅपद्वारे टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना मल्ल्याने सांगितले की, फक्त त्यांनाच माहिती ते बोलतात.
रात्री मध्यापर्यंत मुंबईत आल्यास विजय मल्ल्याला सीबीआय कार्यालयात थोडा वेळ द्यावा लागेल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. यानंतर, दुसर्या दिवशी त्याला न्यायालयात हजर केले जाईल. परंतु जर तो दिवसा येथे पोहोचला तर त्याला थेट न्यायालयात हजर केले जाईल. तेथे सीबीआय त्याच्या रिमांडची मागणी करेल. यानंतर ईडी देखील त्याच्या ताब्यात घेण्याची मागणी करेल, अशी माहिती काल समोर आली होती. ऑगस्ट 2018 मध्ये, विजय मल्ल्या प्रकरणाची सुनावणी करणार्या यूकेच्या कोर्टाने भारतीय चौकशी एजन्सींकडून माहिती मागितली होती की, भारत प्रत्यार्पणानंतर मल्ल्या कोणत्या तुरूंगात ठेवले जातील. यानंतर, तपास यंत्रणांनी मुंबईतील आर्थर रोड जेलच्या एका सेलचा व्हिडिओ शेअर केला आणि सांगितले की प्रत्यार्पणानंतर मल्ल्या येथे ठेवण्याचा विचार करत आहेत. यावेळी विजय मल्ल्याला प्रत्यार्पणानंतर उच्चस्तरीय सुरक्षा बॅरेकमध्ये ठेवण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
विजय माल्या भारतात परततोय; कोणत्याही क्षणी मुंबईत दाखल होणार