पटना – बिहारच्या पटनामध्ये इंडिगो एअरपोर्टमध्ये मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या रुपेश सिंह यांच्या हत्येनंतर आता यात राजकीय नेत्यांनी हस्तक्षेप करण्यास सुरूवात केली आहे. माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी रुपेशच्या घरच्यांची भेट घेतली, त्यावेळी रुपेशच्या मुलीनं सुशील मोदींनी जी विनंती केली ती ऐकून सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं.
रुपेशच्या मुलीने सांगितले की, काका, जेव्हा तो हत्या करणारा सापडेल तेव्हा पहिली गोळी माझी आई मारेल. माझ्या वडिलांना न्याय द्या, मी रडत नाही कारण मी जर रडली तर आईला आतमधून खूप दुखं होईल. रुपेशच्या मुलीचे हे बोल ऐकून बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदींनी मुलीला आपल्या जवळ घेतलं, त्यावेळी उपस्थित असणाऱ्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं.
पटना येथे इंडिगो स्टेशन हेड रुपेश सिंह यांच्या संवरी गावात गुरुवारी माजी उपमुख्यमंत्री आणि राज्यसभा खासदार सुशील मोदींनी नातेवाईकांची भेट घेतली, सुशील मोदी घरात पोहचताच रुपेशच्या आईला अश्रू अनावर झाले, सुशील मोदींनी कुटुंबाचे सात्वन केले, रुपेशची बहिण, मोठा भाऊ, वयोवृद्ध आई-वडील यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. यावेळी जेव्हा रुपेशचा मुलगा आणि मुलगी सुशील मोदी यांच्याजवळ आली, चिमुकल्या मुलीने वडिलांचा मारेकरी सापडल्यास त्याला पोलिसांकडे नव्हे तर माझ्या आईकडून गोळी मारण्याची विनंती केली.
मी जर रडले तर आईला प्रचंड दुखं होईल, रुपेश सिंह यांच्या पत्नी रडून बेहाल झाल्या होत्या. संपूर्ण कुटुंब सध्या रुपेशच्या मारेकऱ्यांना शोधून त्यांना योग्य शिक्षा करावी, आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी करत आहेत, तसेच मुला-मुलींच्या शिक्षणासाठी सुशील मोदींकडे मदतीसाठी विनंती केली. सुशील मोदी यांनी लवकरात लवकर मारेकरी सापडतील, लोकांमध्ये राग आहे ते समजू शकतो, परंतु गुन्हेगारांना कायद्यानुसार योग्य ती कठोर शिक्षा होईल असं आश्वासन सुशील मोदींनी दिलं आहे.
काय आहे ही घटना?
रुपेश कुमार सिंह यांच्यावर दुचाकीस्वारांनी येऊन हल्ला केला, त्यावेळी ते पटना एअरपोर्टवरून पुनाइचक परिसरात त्यांच्या राहत्या घरी निघाले होते, SUV चालवणाऱ्या रुपेश यांना हल्लेखोर इतक्या जवळ आहेत याची भनकही लागली नाही, रुपेश ज्यावेळी अपार्टमेंट आले, तेव्हा हल्लेखोरांनी गोळीबार सुरु केला, त्याच रुपेश यांचा मृत्यू झाला.