आई आपल्या मुलांसाठी काहीही करायला तयार होते. मुलांच्या आनंदातच तिचा आनंद असतो. पण याच दरम्यान नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. रशियामधील एका 25 वर्षीय महिलेने दारू पार्टीच्या नादात आपल्या मुलांकडे दुर्लक्ष केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिरर या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, मित्रांसह दारू पार्टी करण्यासाठी एका महिलेने आपल्या 11 महिन्यांचा मुलगा आणि तीन वर्षांचा मुलीला घरात एका खोलीत बंद केले. चार दिवसांपासून भुकेने व्याकूळ असलेल्या मुलाचा अखेर पाळण्यातचं मृत्यू झाला, तर मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रशियाच्या ज्लाटाउस्टमधील 25 वर्षीय महिला ओल्गा बाजरोवा आपल्या पतीपासून वेगळी राहते. आपल्या मित्रांसह दारू पार्टी करण्यासाठी तिने आपल्या मुलांना मृत्यूच्या दारात ढकल्याची भयंकर घटना आता समोर आली आहे. ती आपला 11 महिन्यांचा मुलगा सेवली आणि 3 वर्षांचा मुलीला घरातच बंद ठेवून पार्टीला गेली. चार दिवस दोन्ही मुलं घरात बंद होते. याच दरम्यान, ओल्गाने आपली मुल कोणत्या अवस्थेत आहेत याची साधी चौकशी देखील केली नाही. पार्टी करून ती जेव्हा घरी आली तेव्हा मुलांची अवस्था पाहून तिला धक्काच बसला.
11 महिन्यांचा मुलगा भूक आणि तहानेने मरण पावला, तर तीन वर्षांची मुलगीही खूपच थकलेली आणि भयभीत होती. घरी जाताना ओल्गाने मुलांच्या आजीशी संपर्क साधला होता. मुलांची आजी जेव्हा घरी पोहचली तेव्हा तिने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी याप्रकरणी ओल्गाला अटक केली, तर मुलीला रुग्णालयात दाखल केले. रशियातील ज्लाटौस्ट शहरात खटल्याच्या वेळी एका कोर्टाने ओल्गा बजरोवावर अल्पवयीन मुलाच्या हत्येचा आरोप केला आहे. तसेच आपल्या मुलांला अत्यंत धोकादायक परिस्थितीत सोडल्यामुळे आईचे कर्तव्य बजाविण्यात अपयशी ठरल्यामुळे दोषी ठरवले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
कोरोना लसीचे डोस वाया घालवणं 'त्याला' पडलं चांगलंच महागात; 3 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
कोरोना लसीचे डोस वाया घालवणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे. कोरोनाच्या संकटात सर्वच गोष्टींची खबरदारी घेणं गरजेचं आहे. याच दरम्यान निष्काळजीपणामुळे एका फार्मासिस्टकडून 500 हून अधिक डोस वाया गेले होते. त्यानंतर कोरोना लसीचे डोस वाया घालवणे फार्मासिस्टला चांगलंच महागात पडलं आहे. या दोषी फार्मासिस्टला तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. स्टीवन ब्रांडेनबर्ग (46) असं या दोषी फार्मासिस्टचे नाव आहे. औषधी उत्पादनात छेडछाड करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता. फेब्रुवारी महिन्यात त्याने त्याच्यावर असलेले आरोप मान्य केले होते.