सचिन वाझे प्रकरणात NIA ने तपासाची चक्रे वेगानं फिरवली आहेत. या प्रकरणात NIA ने आता अजून एक मर्सिडीज जप्त केली आहे. सचिन वाझे प्रकरणात आतापर्यंत एकूण ५ गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. आता NIAच्या अधिकाऱ्यांकडून या गाडीची तपासणी केली गेली. त्यामुळे या कारमधून आता नेमकं काय उघड होणार महत्वाचं ठरणार आहे. यापूर्वी NIAने एक स्पॉर्पिओ, इनोव्हा, एक मर्सिडीज गाडी जप्त केली होती. तर काल वाझे राहत असलेल्या ठाण्यातील साकेत कॉम्प्लेक्समधून आणखी एक टोयोटाची प्रॅडो कार जप्त केली होती. मात्र आज जप्त केलेल्या मर्सिडीजमधून २६ फेब्रुवारीला मनसुख यांना वाझे क्राईम ब्रांचमध्ये चौकशीसाठी घेऊन आले होते.
आज दुपारी NIAने दुसरी मर्सिडीज जप्त करुन ती त्यांच्या कार्यालयात आणली. त्यानंतर NIA अधिकाऱ्यांकडून या गाडीची तपासणी केली आहे. तपासात NIA ने प्रथम अँटिलीयानजीक सापडलेली स्कॉर्पिओ ताब्यात घेतली. त्यानंतर इनोव्हा गाडी सीपी कार्यालयातून ताब्यात घेतली. त्यानंतर सचिन वाझेंना अटक करण्यात आली. पुढे सचिन वाझेंच्या चौकशीनंतर एक काळया रंगाची मर्सिडीज ताब्यात घेण्यात आली. ती गाडी सीएसएमटी जवळच्या एका पार्किंगमधून ताब्यात घेण्यात आली होती. त्यानंतर काल ठाण्यातून प्रॅडो कार जप्त केली. आता आणखी एक मर्सिडीज ताब्यात घेतली आहे. यातून आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
Sachin Vaze : संशय बळावला; सचिन वाझेंच्या सांगण्यावरून सोसायटीमधील CCTV फुटेज काजींनी गायब केले
आधीच्या मर्सिडीजमधून महत्वाची माहिती सापडली
त्या मर्सिडीजमध्ये केरोसीन, ५ लाखाची रोकड, एक पैसे मोजण्याचे मशीन आणि शर्ट सापडले होते. आता जप्त केलेली दुसरी मर्सिडीज कोण वापरत होते?, वाझेच वापरत होते का? असे प्रश्न आहेत. ती मूळ कोणाच्या मालकीची आहे. याचा तपास NIA करेल.
Sachin Vaze : ठाकरे सरकार नव्या पेचात; माझ्यावर नेहमी अन्याय झाला, IPS संजय पांडे बदलीवर नाराज
NIA ने आतापर्यंत ५ गाड्या ताब्यात घेतल्या आहे. शिवाय एक टोयोटाची प्रॅडो कार गाडी वाझेंच्या साकेत कॉम्प्लेक्सच्या कपाऊंडमधून ताब्यात घेतल्याचं सागंण्यात येत आहे. तसेच एक स्कोडा आणि मर्सिडीज कारही NIA च्या रडारवर आहे. एकूण सात गाड्यांचा आतापर्यंतच्या तपासात समावेश आहे. मात्र ५ शोधण्यात NIA ला यश आलं आहे. NIA ने जी टोयोटा प्रॅडो कार काल ताब्यात घेतली आहे, ती अत्यंत महागडी आहे. तसेच इतरही आलिशान गाड्या महागड्या आहेत. त्यामुळे सचिन वाझे यांच्याकडे इतक्या महागड्या गाड्या कुठून आल्या, असा सवाल केला जात आहे.