मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार लावल्या प्रकरणी एनआयएने शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास एन्काऊंटर स्पेशालिस्य सचिन वाझेंना अटक करण्यात आली आहे. या अटकेमुळे मुंबई पोलिस दलात खळबळ उडाली असून आणखी काही अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (NIA will arrest three more people after Sachin Vaze's Arrest.)
अंबानींच्या घराबाहेर लावलेल्या स्कॉर्पिओच्या कटात थेट वाझेंचा सहभाग असल्याचा संशय आल्याने वाझेंना अटक करण्यात आली आहे. या कटात आणखी 5-7 जणांचा समावेश आहे. मुंबई पोलिस दलातील आणखी काही अधिकाऱ्यांची चौकशी होऊ शकते. ठाणे येथून आणखी ३ जणांच्या अटकेची शक्यता असल्याचे एनआयएमधील सुत्रांनी सांगितले आहे.
स्कॉर्पिओ ठेवून दुसऱ्या इनोव्हातून आलेल्या चालक आणि अन्य एका व्यक्तीसह दुसऱ्या चालकाला अटक होण्याची शक्यता आहे. यासाठी एनआयएच्या तीन टीम रवाना झाल्या आहेत. पोलीस अधिकारीही रडारवर असल्याने पोलीस आयुक्तालयात खळबळ उडाली आहे.
गुन्हा दाखलवाझे यांनी अटकेपासून वाचण्यासाठी शुक्रवारीच जिल्हा सत्र न्यायालय ठाणे येथे अंतरीम जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. एनआयएने सांगितल्यानुसार, सचिन वाझे यांना आईपीसीच्या कलम 286, 465, 473, 506(2), 120 बी आणि 4 (ए)(बी)(आय) स्फोटक वस्तू कलम 1908 अंतर्गत अटक करण्यात आली आहे. या कलमांमध्ये वाझेंनी ही कार तिथे लावण्यात महत्वाची भूमिका बजावल्यासंदर्भात कलमाचा समावेश आहे. वाझेंवर फसवणूक, विस्फोटकांशी निष्काळजीपणा बाळगणे, बनावट मोहर बनविणे आणि धमकी देण्याचे आरोप लावण्यात आले आहेत. स्कॉर्पिओ कारचे मालक मनसूख हिरेन हत्या प्रकरणातही वाझेंचे नाव येत आहे. वाझे यांचा अंबानी यांच्या निवासस्थानाशेजारी जिलेटीनने भरलेली कार पार्क करण्याच्या कटात थेट सहभाग होता, असा आरोप एनआयएने लावला आहे. यामुळे मनसूख हिरेन मृत्यू आणि स्फोटकांच्या कारचा थेट संबंध वाझेंशी जोडला जाण्याची शक्यता आहे.
अर्णब यांच्या अटकेसाठी ‘त्या’ स्कार्पिओचा वापर -
साहाय्यक निरीक्षक सचिन वाझे यांच्याकडील चौकशीतून धक्कादायक माहिती समोर येत आहे. हिरेन यांच्या महिंद्रा स्कॉर्पिओचा वापर सुमारे चार महिन्यांपूर्वी अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवेळी (4 नोव्हेंबर) करण्यात आला होता. 25 फेब्रुवारीला उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ जिलेटिनच्या कांड्या असलेली कार सापडली होती. ती तेव्हा वाझे यांच्याकडे होती. याच गाडीतून अर्णब गोस्वामी यांच्या घरी ते गेले होते. मात्र त्या वेळी या स्कॉर्पिओला अन्य नंबर प्लेट लावली होती, असे सूत्रांकडून सांगण्यात येते.