मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटकं प्रकरणात मुंबई पोलीस दलातील निलंबित अधिकारी सचिन वाझे यांना NIA ने अटक केली आहे. तर मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी महाराष्ट्र एटीएस तपास करत आहे. त्यामुळे सचिन वाझे यांचा ताबा एटीएसला हवा आहे. त्यासाठी सचिन वाझे यांच्याविरोधात भक्कम पुरावे असल्याचा दावा एटीएसने कोर्टात केला आहे. एटीएसच्या या दाव्यामुळे सचिन वाझे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
सचिन वाझे यांचा मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणातही हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यातच वाझे यांच्याविरोधात अनेक महत्त्वाचे ठोस पुरावे एटीएसच्या हाती लागले आहेत. सचिन वाझेंचा प्रथम दर्शनी हत्या प्रकरणात सहभाग असल्याचा दावा करण्यात येत आहे. एटीएसचे अधिकारी शिवदीप लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरु असून अनेक जबाब देखील घेण्यात आले आहेत.
Sachin Vaze : प्रॅडो कारचे गूढ अखेर आलं बाहेर; जिलेटीन कांड्या मुंबईत आणण्यासाठी झाला होता वापर
Sachin Vaze : सचिन वाझे यांच्या अटकपूर्व जामिनावर ३० मार्चला सुनावणी
आज कोर्टात एटीएसने तब्बल ४ पानांचा अहवाल दिला असून त्यामध्ये अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. NIA कोर्टातून सचिन वाझे यांचा ताबा मिळावा या करता एटीएसने ठाणे कोर्टातून परवानगी देखील मिळवली आहे. NIA च्या अटकेत असलेल्या सचिन वाझे वापरत असलेल्या एका पेक्षा एक आलिशान गाड्या पाहून अनेकांना आश्चर्य वाटत आहे. कारण एका साधारण API म्हणजेच सहाय्यक पोलीस निराक्षकाकडे एवढ्या महागड्या गाड्या आल्याच कशा असा प्रश्न अनेकांना पडला आहे. NIA ने आतापर्यंत सचिन वाझे वापरत असलेल्या ५ गाड्या जप्त केल्या आहेत.