शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

Sachin Vaze: सचिन वाझेच्या डायरीत कोडवर्डमध्ये वसुलीच्या नोंदी; एनआयएची पडताळणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 5:11 AM

पब्ज, बार, बुकींसह इतर कारवायांचा उल्लेख

मुंबई : स्फोटक  कारप्रकरणी अटकेत असलेला निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे  याच्या कार्यालयातून  राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) एक डायरी जप्त केली आहे. २०० पानांच्या या डायरीतून त्याचे आर्थिक व्यवहार व वसुलीचे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. डायरीत पब्ज, बार, बुकी आणि इतर महत्त्वाच्या कारवायांचा उल्लेख आहे. कोडवर्डमध्ये वसुलीबद्दल तपशील नमूद  असल्याचे  अधिकऱ्यांनी सांगितले.

 उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानापासून जवळ सापडलेल्या स्फोटक कारप्रकरणी एनआयएने सीआययूचा प्रमुख सचिन वाझेला १३ मार्चला अटक केली. त्यानंतर पोलीस मुख्यालयातील कार्यालयाची  झडती घेऊन संगणक, आयपॉडसह अनेक साहित्य जप्त केले. त्यामध्ये ही डायरी त्यांच्या हाती लागली. कुणाला किती पैसे जात होते, याचा हिशेब वाझे ठेवत होता. 

या डायरीत मुंबईतील सर्व बार, पब आणि हुक्कापार्लरची यादीही आहे. ज्यांनी पैसे दिले त्याची नोंद असल्याचेही समाेर आले आहे. लाखाच्या नोंदीसाठी एल, तर हजाराच्या नोंदीसाठी के अक्षर वापरले आहे. बार, पब, हुक्का पार्लर यांची येणारी रक्कम आणि दिलेली रक्कमही लिहिली आहे. पैशांचे वाटप नियमित होत होते.  त्याबाबतही कोड भाषेत नोंद आहे. 

वाझेच्या अटकेनंतर एनआयएने पाच आलिशान गाड्या, साडेपाच लाखांची रोकड, पैसे मोजण्याची मशीन जप्त केली. तसेच त्यांच्या हाती संशयित डायरीही लागली आहे. त्यातून वाझेेने केलेल्या  आर्थिक उलाढाली स्पष्ट होत असल्यामुळे, आता या  प्रकरणाचा अधिक तपास  हा सक्तवसुली संचालनालयाकडूनही (ईडी) करण्यात येईल, अशी शक्यता आहे.

पुण्यातील फॉरेन्सिककडून जप्त गाड्यांची तपासणीजिलेटीनच्या कांड्या असलेल्या स्कॉर्पिओची मंगळवारी पुण्यातील फॉरेन्सिक पथकाने तपासणी केली. या कारसह जप्त केलेल्या पाचही गाड्यांचा फॉरेन्सिक अहवाल नव्याने तयार करण्यात येईल.एनआयएच्या अटकेत असलेल्या सचिन वाझेची एनआयए कोठडीची मुदत २५ मार्चला संपत आहे. त्यानंतर मनसुख हिरेनच्या हत्येप्रकरणी प्रमुख संशयित आरोपी असलेल्या वाझेला एटीएस अटक करणार आहे. त्याला ताब्यात घेण्यासाठी एटीएसने न्यायालयातून वाॅरंट मिळविले आहे. त्यामुळे त्याचा ताबा जाण्यापूर्वी सर्व तांत्रिक पुरावे जमवत आहेत. त्यासाठी पुण्यातील फॉरेन्सिक तंत्रज्ञांना बाेलावण्यात आले होते. 

हुक्का पार्लरमधून ११ कोटींची वसुलीसचिन वाझेकडे वसुलीचे काम होते, ती तो रक्कम कोणाला देत होता, याबद्दल अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र  मुंबईतील हुक्का पार्लरमधून ११ कोटींची वसुली केल्याचे डायरीत नमूद असल्याचे समजते. 

टॅग्स :sachin Vazeसचिन वाझेNIAराष्ट्रीय तपास यंत्रणाMukesh Ambaniमुकेश अंबानी