शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय वादांचे बॉम्ब, निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांचे फटाके, नवनवीन मुद्दे आणि वादग्रस्त वक्तव्यांची मालिका
2
Susie Wiles : कोण आहेत सूझी विल्स? ज्यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी बनवलं व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफ
3
निवडणुकीत अल्पसंख्याक मतदारांची भूमिका महत्त्वाची, राज्यातील ३५ जागांवर ठरणार निर्णायक
4
US Fed Rate Cut : अमेरिकेत पुन्हा व्याजदरात कपात; फेडनं ०.२५ टक्के कमी केला रेट, शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
5
आजचे राशीभविष्य, ८ नोव्हेंबर २०२४ : प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल, खर्चाचे प्रमाण वाढेल
6
कांदा ८०, लसूण ५०० रुपये किलो! निवडणुकीच्या तोंडावर दरवाढ, सर्वपक्षीय उमेदवारांना टेन्शन
7
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
8
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
9
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
10
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
11
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
12
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
13
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
14
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
15
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
16
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
17
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
19
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
20
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'

Sachin Vaze Remanded till 25 march : सचिन वाझेंना कोर्टाने सुनावली 11 दिवसांची NIA कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2021 4:00 PM

Sachin Vaze Remand: आज सुट्टीकालीन कोर्टात ४० मिनिटं युक्तिवाद करण्यात आला. 

ठळक मुद्दे पुन्हा वाझे यांना NIA कोर्टात रिमांडसाठी २५ मार्चला हजर करण्यात येईल. कोर्टाकडे NIAने १४ दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र सचिन वाझे यांना 11 दिवसाची NIA कोठडी कोर्टाने सुनावली आहे.

२५ फेब्रुवारीला प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार प्रकरणी एनआयएने शनिवारी रात्री ११.५० वाजता सचिन वाझेंना अटक करण्यात आली आहे. काल १३ तास NIA कडून सचिन वाझे यांची झाडाझडती घेण्यात आली. आज दुपारी २.३० वाजताच्या सुमारास सत्र न्यायालयातील विशेष NIA कोर्टात सुट्टीकालीन खंडपीठासमोर दाखल करण्यात आले. कोर्टाकडे NIAने १४ दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र सचिन वाझे यांना 11 दिवसाची NIA कोठडी कोर्टाने सुनावली आहे.त्यामुळे पुन्हा वाझे यांना २५ मार्चला NIA कोर्टात रिमांडसाठी हजर करण्यात येईल.  आज सुट्टीकालीन कोर्टात ४० मिनिटं युक्तिवाद करण्यात आला. 

सचिन वाझे यांचे वकिलांनी कोणतेही ठोस पुरावे नसताना अटक केली असून केवळ संशयावरून अटक केली असल्याचा युक्तिवाद कोर्टात केला. तर NIA ने सखोल चौकशी करण्यासाठी कोठडीची मागणी केली आहे.  प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीत स्फोटके सापडल्याप्रकरणी तब्बल 13 तासांच्या चौकशीनंतर एपीआय सचिन वाझे (Sachin Vaze) यांना एनआयएने अटक केली आहे. एनआयएने सांगितल्यानुसार, सचिन वाझे यांना आईपीसीच्या कलम 286, 465, 473, 506(2), 120 बी आणि 4 (ए)(बी)(आय) स्फोटक वस्तू कलम 1908 अंतर्गत अटक करण्यात आली आहे. तसेच सचिन वाझेंच्या अटकेनंतर ठाण्यातून आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामध्ये इनोव्हा गाडीतून जाणारे दोन्ही चालक आणि एका व्यावसायिकाचा समावेश असल्याचे सांगितले जाते.

 

सचिन वाझे यांच्या अटकेमुळे मुंबई पोलिस दलात खळबळ उडाली आहे. आता NIA कडून सहाय्यक पोलीस निरीक्षक रियाझ काझी यांची गेल्या ५ तासांपासून चौकशी सुरु आहे.  NIA सचिन वाझे यांचे जवळचे मित्र रियाझ काझी यांच्या चौकशीनंतर CIU विभागातील आणखी काही पोलिसांची चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच विक्रोळी पोलीस ठाण्यातील पोलिस देखील NIA च्या चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. कारण, १८ फेब्रुवारीला विक्रोळी पोलिसांनी कोणत्या कागदपत्रांच्या आधारे आणि कोणत्या पोलीस अधिकाऱ्याच्या इशाऱ्यावरून स्कॉर्पिओ चोरीस गेल्याची तक्रार दाखल केली गेली, याचा तपास NIA करू शकते.

टॅग्स :sachin Vazeसचिन वाझेNIAराष्ट्रीय तपास यंत्रणाCourtन्यायालय