मुंबई - प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलीया निवास्थानाबाहेर स्फ़ोटकांसह स्कॉर्पिओ कार प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA ) शनिवारी उशिरा रात्री निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेंनी बेड्या ठोकल्या. कोर्टाने त्यांना २५ मार्चपर्यंत NIA कोठडी सुनावली असून NIA ने या तपासासाठी कंबर कसली आहे. काल उशिरा रात्री मुंबईपोलिसांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत CIU विभागाची झाडाझडती घेऊन सचिन वाझे यांचा कॉम्प्युटर, मोबाईल आणि महत्वाचे कागदपत्रे हस्तगत केली आहेत.
NIA कडून आतापर्यंत CIU च्या ७ अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात आली आहे. पुरावे मिळविण्याच्या उद्देशाने NIA ने ही झाडाझडती घेतली. मुंबई पोलिसांच्या अधिकाऱ्यांच्या समोर NIA ने CIU कार्यालयात सर्च ऑपरेशन केले आहे. मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या नवीन इमारतीत CIU चे कार्यालय आहे. CIU कार्यालयातून NIA च्या पथकाने सचिन वाझे यांचा मोबाईल, कॉम्प्युटर आणि महत्वाचे कागदपत्रे जप्त केली आहेत. त्यामुळे सचिन वाझेंबाबत मोठे खुलासे होऊ शकतात. त्यांची महत्वाची माहिती NIA च्या हाती लागण्याची शक्यता आहे, अशी माहिती एका वृत्तवाहिनीने दिली आहे.
हा तर नियतीचा न्याय, सचिन वाझेंच्या अटकेवर ख्वाजा युनुसच्या आईची प्रतिक्रिया
२५ फेब्रुवारीला अंबानींच्या घराबाहेर स्फोटके मिळाल्याचे समजल्यानंतर एटीएसचे पथक त्याठिकाणी पोहोचले. तेव्हा एटीएसच्या अधिकाऱ्याने स्फोटके ठेवलेली स्कॉर्पिओ कुठे आहे, असा सवाल सचिन वाझे Sachin Vaze यांना विचारला. त्यावेळी सचिन वाझे सँडविच खात उभे होते. त्यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याला, साहेबांना गाडी दाखव, असे सांगितले. सचिन वाझे यांच्या या वर्तणुकीमुळे संबंधित एटीएस अधिकारी प्रचंड संतापला होता. सचिन वाझे यांनी पोलिसांच्या प्रोटोकॉलचे पालन केले नाही, अशी तक्रारही त्याने वरिष्ठांना केल्याची माहिती मिळत आहे.