सचिन वाझेला खंडणी प्रकरणात ६ नोव्हेंबरपर्यंत गुन्हे शाखेची कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2021 10:07 PM2021-11-01T22:07:22+5:302021-11-01T22:15:57+5:30
Sachin Vaze :साक्षीदारांचे नाव आणि पत्ता गोपनीय ठेवला असला तरीही आरोपी त्यांना शोधून काढू शकतो. कारण आरोपी मुंबईत अत्यंत प्रभावशाली अधिकारी होता, अशी भीती एनआयएने कोर्टात व्यक्त केली होती.
मुंबईचे बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेला आज खंडणीच्या प्रकरणात कोर्टाने हजर करण्यात आले होते. याप्रकरणी गुन्हे शाखेने त्यांच्या १० दिवसांची कोठडीची मागणी केली होती. त्यानंतर ६ नोव्हेंबरपर्यंत सचिन वाझेला गुन्हे शाखेची कोठडी सुनावली आहे.
तळोजा कारागृहातून तात्पुरती बदली करून घरीच नजरकैदेत राहण्यासाठी बडतर्फ केलेले मुंबई पोलीस अधिकारी सचिन वाझेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. वाझेंच्या या याचिकेला एनआयएने (NIA) विरोध केला आहे. जर वाझेला नजरकैदेत ठेवण्याची परवानगी दिली तर तो फरार होण्याची शक्यता जास्त आहे. तसेच तो सरंक्षित साक्षीदार जे त्याचे सहकारी होते, त्यांना प्रभावित करण्याची शक्यता आहे. आरोपी त्यांना लगेच ओळखू शकतो. साक्षीदारांचे नाव आणि पत्ता गोपनीय ठेवला असला तरीही आरोपी त्यांना शोधून काढू शकतो. कारण आरोपी मुंबईत अत्यंत प्रभावशाली अधिकारी होता, अशी भीती एनआयएने कोर्टात व्यक्त केली होती.
उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात एनआयएने सचिन वाझेवर व्यापारी मनसुख हिरेनच्या हत्येचा कट आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली कार ठेवण्यासह गंभीर गुन्ह्यांचा आरोप आहे, त्यामुळे त्यांना नजरकैदेत राहण्याची परवानगी देण्यात येऊ नये, असे नमूद केले होते.
#UPDATE | Esplanade Court sends dismissed Mumbai Police officer Sachin Waze to Crime Branch custody till November 6th, in connection with an extortion case
— ANI (@ANI) November 1, 2021