शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
4
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
5
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
6
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
7
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
8
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
9
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
10
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
11
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
12
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
13
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
14
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
15
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
16
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
17
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
18
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
19
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
20
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."

Sachin Vaze : सचिन वाझेसाठी शिंदे करायचा भांडुप, मुलुंडमधून वसुली, माेबाइल, डायरीतून खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2021 7:38 AM

Sachin Vaze Case: मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या निलंबित पाेलीस अधिकारी सचिन वाझेने बडतर्फ कॉन्स्टेबल विनायक शिंदेवर भांडुप, मुलुंड परिसरातील हप्ता वसुलीची जबाबदारी सोपविली होती.

मुंबई : मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या निलंबित पाेलीस अधिकारी सचिन वाझेने बडतर्फ कॉन्स्टेबल विनायक शिंदेवर भांडुप, मुलुंड परिसरातील हप्ता वसुलीची जबाबदारी सोपविली होती. या परिसरातील ३२  बार व क्लबमधून  तो गेल्या सात महिन्यांपासून वसुली करत होता, अशी माहिती समोर आली आहे.  शिंदेच्या मोबाइलमध्ये आणि त्याच्या घरी सापडलेल्या डायरीत हफ्ता वसुली  करणाऱ्या ठिकाणांची यादी मिळाली आहे. ३२ क्लब, बार व लॉजेसची नावे त्यामध्ये असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. एनआयएच्या अटकेत असलेल्या वाझेने शिंदे व क्रिकेट बुकी नरेश गोरच्या  साथीने मनसुख हिरेनची हत्या केल्याचे पुरावे सापडले आहेत. लखन भैया बनावट एन्काऊंटर  प्रकरणात शिक्षा झालेला बडतर्फ कॉन्स्टेबल शिंदे गेल्यावर्षी मे  महिन्यापासून पेरॉलवर बाहेर होता. वाझेच्या संपर्कात राहून त्याने वाझेकडून हप्ता वसुलीचे काम मिळविले होते. दर महिन्याला लाखो रुपये घेऊन तो वाझेला पोहोचवित होता, त्याबदल्यात त्याला कमिशन मिळत असे, अशी माहिती अधिकाऱ्यांना मिळाली आहे. काझी, ओव्हाळची चौकशी सुरूच जिलेटिनच्या कांड्या सापडलेल्या स्फाेटक कारप्रकरणी सचिन वाझेचे सीयूआयमधील तत्कालीन सहकारी सहायक निरीक्षक रियजुद्दीन काझी व प्रशांत ओव्हाळ यांची एनआयएकडून झाडाझडती सुरूच आहे.  बुधवारी त्यांच्याकडे चार तास चौकशी करण्यात आली. त्यांना दररोज कार्यालयात बोलावून वाझेबद्दल आणि स्फोटक कार व हिरेन हत्या प्रकरणातील त्यांच्या सहभागाबद्दल माहिती घेण्यात येत आहे. वाझे कशासाठी सिम कार्ड वापरणार याची कल्पना नव्हती मुंबई : मैत्रीच्या नात्याने आपण सचिन वाझे व नरेश गोर यांना  मोबाइलचे सिम कार्ड दिले होते, त्याचा वापर ते कशासाठी करणार होते, याची कल्पना नव्हती, अशी माहिती अहमदाबाद येथील किशोर ठक्करने राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना (एनआरआय)  दिल्याचे समजते. एटीएसकडून मंगळवारी ठक्करला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडे चौकशी करण्यात येत आहे. मनसुख हिरेन यांच्या हत्येशी आपला काहीही संबंध नसून, त्यांना आपण ओळखतही नसल्याचा दावा त्याने केला. ठक्करने वाझे व  विनायक शिंदे यांच्याबद्दल आपल्याला फारशी माहिती नसल्याचे  सांगितलेहिरेन हत्या प्रकरणाचा उलगडा  एटीएसने केल्यानंतर त्यांचे एक पथक मागच्या आठवड्यात  अहमदाबादला गेले होते. ठक्करला ट्रांझिस्ट रिमांडवर ताब्यात घेऊन मंगळवारी ते मुंबईत  परतले. या गुन्ह्याचा तपास त्यांच्याकडे वर्ग केल्याने त्याला त्यांच्या ताब्यात देण्यात आले.गाेरमुळे झाली  वाझेशी ओळख!क्रिकेट बुकी नरेश गोर आपल्या परिचयातील असल्याने त्याच्या माध्यमातून वाझेशी ओळख झाली, त्याच्या मागणीवरून सीम कार्ड पाठविले, कार्ड दिल्यानंतर  आपण त्यांच्या संपर्कातही नव्हतो, असे ठक्कर याने चाैकशीत सांगितल्याचे समजते.

टॅग्स :sachin Vazeसचिन वाझेMumbaiमुंबईCrime Newsगुन्हेगारीNIAराष्ट्रीय तपास यंत्रणा