ठळक मुद्देएनआयएने सचिन वाझेंविरोधात यूएपीएची कलम १६ आणि १८ लावण्यात आली आहे. एनआयएच्या हाती सचिन वाझे यांच्या ट्रायडंट हॉटेलमधील मुक्काम केल्याचे आणखी काही तपशील समोर आले होते.
प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी स्फोटक प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (NIA) निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर UAPA (बेकायदा कारवाया प्रतिबंध कायदा) अंतर्गत कारवाई होणार आहे. एनआयएने सचिन वाझेंविरोधात यूएपीएची कलम १६ आणि १८ लावण्यात आली आहे. एनआयएच्या हाती सचिन वाझे यांच्या ट्रायडंट हॉटेलमधील मुक्काम केल्याचे आणखी काही तपशील समोर आले होते. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबई येथील निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली एसयूव्ही ठेवण्यात महत्वाची भूमिका असल्याने वाझे सध्या एनआयएच्या कोठडीत आहेत.
NIA ने सचिन वाझे यांच्या विरोधात यूएपीए म्हणजेच Unlawful Activities Prevention Act हा कायदा लावण्याची मागणी केली आहे. यूएपीए कायदा लागल्याने सचिन वाझे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. हा कायदा दहशतवाद्यांवर किंवा राष्ट्रविरोधी कारवायांमध्ये सहभाग असणाऱ्यांविरोधात लावला जातो. सोमवारी NIA ने सचिन वाझे राहत असलेल्या ट्रायडंटमधील रूमची झाडाझडती घेतली होती. याठिकाणी NIA च्या अधिकाऱ्यांचे जवळपास तीन तास सर्च ऑपरेशन सुरु होते. त्यानंतर NIA अधिकाऱ्यांनी ट्रायडंट हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज घेऊन जप्त केले होते.