मुंबई: मनसुख हिरेन यांच्या हत्येमागे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचाच हात असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकातील (ATS) एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं याबद्दलची माहिती दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक पदावरून निलंबित करण्यात आलेले वाझे सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) ताब्यात आहेत. मुकेश अंबानींच्या घराबाहेर आढळून आलेल्या स्फोटकांनी भरलेल्या कार प्रकरणात वाझेंना एनआयएनं अटक केली आहे. (sachin vaze was involved in mansukh hiren murder case claims ats official)काही होणार नाही; प्रकरण वाझे साहेबांकडेच आहे; मनसुख हिरेन यांचं भावासोबतचं संभाषण NIAकडेमनसुख हिरेन प्रकरणात एटीएसने एक बुकी आणि एका माजी पोलीस कर्मचाऱ्याला अटक केली आहे. नरेश गोर असं अटक करण्यात आलेल्या बुकीचं नाव आहे. तर विनायक शिंदे हा मुंबई पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होता. लखनभैय्या एन्काऊंटर प्रकरणात तो दोषी आढळून आला होता. मनसुख हिरेन यांच्या हत्येमागे वाझेचाच हात असल्याची कबुली विनायक शिंदेने दिल्याची माहिती एटीएसच्या अधिकाऱ्यानं नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली आहे. टीव्ही९ नं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. मोठा खुलासा! मनसुख हिरेन प्रकरणात अहमदाबाद कनेक्शन आलं समोर एटीएसचे डीआयजी शिवदीप लांडे यांनी काल (रविवारी) एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा उलगडा झाल्याचा दावा केला. त्यानंतर एटीएसमधल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं हिरेन हत्या प्रकरणात वाझेचाच हात असल्याची कबुली शिंदेने दिल्याचं सांगितलं. हिरेन हत्या प्रकरणाचा तपास एटीएसकडून सुरू आहे. तर एनआयए मुकेश अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या कारसोबतच हिरेन यांच्या हत्येचाही तपास करत आहे.
मुंब्रा रेतीबंदर परिसरात घटनेचं नाट्य रुपांतरएटीएसचं एक पथक आज विनायक शिंदेला घेऊन मुंब्रा रेतीबंदर परिसरात पोहोचलं. याच ठिकाणी मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळून आला होता. एटीएसच्या पथकानं या परिसरात घडलेल्या घटनेचं रिक्रिएशन केलं. त्यासाठी या प्रकरणातील आरोपी विनायक शिंदेला रेतीबंदर परिसरात आणण्यात आलं होतं.