गर्लफ्रेन्डसोबत साखरपुडा मोडला म्हणून SAF जवानाकडून गोळीबार, तिच्या आई अन् भावावर झाडल्या गोळ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 01:01 PM2021-03-31T13:01:24+5:302021-03-31T13:04:02+5:30
पीडितेच्या परिवारानुसार, त्यांच्या मुलीचा आणि आरोपीचा साखरपुडा झाला होता. पण काही कारणाने हा साखरपुडा मोडला.
भोपाळमध्ये एका माथेफिरू SAF (स्पेशल आर्म्ड फोर्स) जवानाने गर्लफ्रेन्डच्या घरी जाऊन गोळीबार केला. तो लग्न मोडल्याने इतका संतापला होता की त्याने गर्लफ्रेन्डच्या भावावर आणि आईवर दारू पिऊन गोळ्या झाडल्या. दोघांचीची स्थिती गंभीर असून खाजगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. यादरम्यान तरूणीच्या भावाचा मृत्यू झाला. त्याच्या पोटात गोळी लागली होती तर आईच्या पायाला लागली होती. जवानाने सरकारी एसएलआर रायफलने गर्लफ्रेन्डच्या घरी गोळ्या झाडल्या.
एसएएफ ७व्या बटालियनचा जवान संघ कार्यालय समिधाच्या सुरक्षेसाठी तैनात होता. या घटनेवाली तरूणीच्या परिवारातील इतर सदस्यही तिथे उपस्थित होते. त्यांनी आरोपीकडून रायफल हिसकावून घेतली. नाही तर त्याने आणखी काही लोकांवर गोळ्या झाडल्या असत्या. पीडितेच्या परिवारानुसार, त्यांच्या मुलीचा आणि आरोपीचा साखरपुडा झाला होता. पण काही कारणाने हा साखरपुडा मोडला. एसएएफ जवान अजीत सिंह चौहान मंगळवारी रात्री उशीरा तरूणीच्या घरी आला आणि पूर्ण परिवाराला जीवे मारण्याची देत त्याने फायरींग सुरू केलं. (हे पण वाचा : बाबो! २ वर्षांपासून माहेरी जाऊन बसली पत्नी, पतीचा ५० फूट उंच झाडावर चढून हाय व्होल्टेज ड्रामा!)
डीआयजी इरशाद वली म्हणाले की, आरोपी एसएएफ जवान पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याच्यावर एफआयआऱ दाखल करण्यात आला आहे. तरूणीच्या आईची स्थिती ठीक आहे. एका टीम तयार करण्यात आली असून प्रकरणाची चौकशी केली जात आहे.
पोलिसांनुसार, तरूणीच्या नातेवाईकांनी आरोपीकडून रायफल हिसकावून घेतली आणि त्याला किचनमध्ये कोंडलं. तिथे त्याने त्याची वर्दी जाळली आणि रायफलचे काडतूस ब्लास्ट करण्याचा प्रयत्न केला. त्याने एकूण १० राउंड फायर केले. तो नशेत होता. तरूणी आणि जवान गर्लफ्रेन्ड-बॉयफ्रेन्ड होते. दोघांचा साखरपुडा झाला होता.