ठाणे : कळवा येथे राहणाऱ्या एका 9 वर्षीय मुलीस अज्ञात इसमाने पळवून नेल्याची घटना घडली होती. या घटनेचा समांतर तपास करीत असताना, ठाणे गुन्हे शाखेच्या घाटक 1 ला मिळालेल्या माहिती नुसार मुंबई शिवडी येथून ताब्यात घेवून तिची सुखरूप सुटका करून कळवा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले, असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कळवा येथील शांतीनगर भागात राहणाऱ्या एका 30 वर्षीय इसमाने 27 जानेवारी 2021 रोजी कळवा पोलीस ठाण्यात पळवून नेल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने ठाणे गुन्हे शाखा घटक 1 ने समांतर तपास करीत असताना, गुन्हे शाखा, घटक 1 ला मिळालेल्या माहिती नुसार, यातील फिर्यादी यांची पत्नी जून 2020 मध्ये तीन मुले व पती यास सोडुन कोठेतरी निघुन गेली होती. त्याबाबत कळवा पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल आहे.
सदर महिलेस (फिर्यादी यांची पत्नीस) घटनेच्या दिवशी फिर्यादी यांच्या घराचे आजुबाजुस पाहण्यात आले होते. त्यावरून तिच अपहरण झालेल्या मुलीला घेवुन गेली असल्याचा संशय आल्याने तिचेबाबत माहिती घेतली असता, ती महिला शिवडी, मुंबई येथे असल्याची माहिती मिळाली. प्राप्त माहितीच्या आधारे तिचा शोध घेता सदर महिला फिर्यादी यांची पत्नी ही अपहरण झालेली 9 वर्षीय मुलगी दारूखाना, शिवडी, मुंबई येथे मिळाली. त्या मुलीला ताब्यात घेवुन पुढील तर्जविजकामी कळवा पोलिसांच्या ताब्यात दिले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.