अरे देवा! इन्स्टाग्रामचं वेड, लखपती होण्याची इच्छा; २ मुलांच्या आईने व्हॅलेंटाईन डेला केलं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 13:15 IST2025-02-16T13:14:49+5:302025-02-16T13:15:25+5:30

लोक प्रसिद्धी मिळविण्यासाठी काहीही करण्यास तयार असतात.

sagar two children mother wanted rich by instagram committed crime on valentine day husband feel shame | अरे देवा! इन्स्टाग्रामचं वेड, लखपती होण्याची इच्छा; २ मुलांच्या आईने व्हॅलेंटाईन डेला केलं असं काही...

फोटो - hindi.news18

मध्य प्रदेशातील सागरमध्ये एक अजब घटना घडली आहे. जरुआखेडा येथून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. दोन मुलांची आई घरातून पळून गेली. तिला इन्स्टाग्रामवर रील बनवण्याची खूप आवड होती. तिथे तिची एका तरुणाशी भेट झाली. असं सांगितलं जात आहे की, महिला तरुणाच्या प्रेमात पडली. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी पळून गेली.

आता तिचा नवरा तिच्या शोधात इकडे तिकडे भटकत आहे. पोलीस स्टेशनमध्ये बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. पतीने पोलिसांना सांगितलं की, त्याची पत्नी इन्स्टाग्रामवर रील बनवायची. तिला प्रसिद्ध होण्याची आवड होती. आरोपी तरुणाने याचा फायदा घेतला आणि लखपती होण्याचं आमिष दाखवून तिच्याशी बोलू लागला. 

लोक प्रसिद्धी मिळविण्यासाठी काहीही करण्यास तयार असतात. बांद्रीचा रहिवासी असलेल्या खुशीरामसोबत असंच काहीस घडलं आहे. किराणा दुकान चालवून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. १३ फेब्रुवारी रोजी सकाळी त्यांची पत्नी बसंती तिच्या आठ आणि तीन वर्षांच्या मुलांसह जरुवाखेडा येथून निघाली. पत्नी इन्स्टाग्रामचा खूप वापर करायची. तिथेच तिची तरुणासोबत ओळख झाली होती.  

पतीने सांगितलं की, जेव्हा त्याने आपल्या पत्नीला समजावण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने घरातून पळून जाण्याची धमकी देण्यास सुरुवात केली. त्या तरुणाने त्याला जीवे मारण्याची धमकीही दिली. आता पत्नीचा मोबाईल बंद आहे. आरोपी तरुणाने पत्नीला इन्स्टाग्रामवरून लाखो रुपये कमवण्याचं आमिष दाखवलं होतं. तेव्हापासून त्याची पत्नी घरातून बेपत्ता आहे. पतीने बडोदिया कलान पोलीस स्टेशन गाठलं. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Web Title: sagar two children mother wanted rich by instagram committed crime on valentine day husband feel shame

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.