कुमार बडदे
मुंब्राः गुजरातमधील द्वारका येथे नुकताच ३५० कोटी रुपायांच्या अमली पदार्थासहअटक करण्यात आलेला मुंब्र्यातील सज्जाद घोसी हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे.तो मुंब्र्यातील कौसा भागात मागील अनेक वर्षापासून त्याच्या कुटुंबासह रहातो.
मागील काही दिवसांपासून अमली पदार्थावरुन सुरु असलेल्या उलट सुलट चर्चाच्या पार्श्वभूमीवर त्याला करण्यात आलेल्या अटकेमुळे तो वास्तव्यास असलेले मुंब्रा शहर पुन्हा एकदा प्रकाशझोता मध्ये आले आहे.त्याच्या अटकेमुळे या शहराकडे इतर शहरातील नागरीकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याच्या कथित शक्यतेमुळे येथील नागरीक पुन्हा एकदा मानसिक तणावाखाली वावरु लागले आहेत.सूत्राकडून मिळालेल्या माहिती नुसार त्याने ज्याला ५० हजार रुपये उधार म्हणून दिले होते.तो ते परत देत नव्हता.यामुळे संतप्त होऊन उधार पैसे घेतलेल्याला घरी बोलवून १३ वर्षापूर्वी २००८ मध्ये त्याने त्याची हत्या केली होती.
हत्येनंतर मृतदेहाचे तुकडे करुन ते बायपास रस्त्यावर फेकण्यासाठी जाताना त्याला पोलिसांनी अटक केली होती.कोरोना निमित्त कारागृहातील आरोपींना सोडण्यात आलेल्या संचित रजे अंतर्गत (पँरोलवर) तो सध्या कारागृहा मधून बाहेर आला होता.तो कल्याण येथील बैलबाजारामध्ये भाजीचा घाऊक व्यवसाय करतो.शनिवारी तो कामानिमित्त बाहेर जातो म्हणून घराबाहेर जातो म्हणून घराबाहेर पडला होता.परंतु कुठल्या कामासाठी आणि कुठे चालला आहे,तसेच परत कधी येणार याची माहिती त्याने त्याच्या कुटुंबातील सदस्यांना दिली नव्हती.व्यावसाया निमित्त नेहमी प्रमाणे तो गेला असेल असे त्याना वाटले होते.दरम्यान लाखो नागरीकांच्या या शहरा मधील एखाद्या नागरीकांला एखाद्या गुन्ह्यात अटक झाल्यानंतर इतर शहरातील नागरीकांनी त्याच दृष्टीने येथील नागरीकांकडे बघू नये.असे मत मुंब्र्यातील जागृक नागरीकांनी लोकमत कडे व्यक्त केले.