राजधानी दिल्लीत एका अल्पवयीन मुलीचा ३४ वार करुन हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. आरोपी साहिल याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही हत्या सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली असून याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पोलीस आरोपी साहिलची चौकशी करत आहेत. चौकशीत साहिलने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आरोपी साहिलने हत्येपूर्वी अनेक वेब सीरीज पाहिल्या आहेत. विशेष म्हणजे श्रद्धा वालकरची हत्या करणारा आरोपी आफताब याने हत्येपूर्वी एक वेब सिरीजही पाहिली होती. आता असीच वेबसिरीज या साहिलनेही पाहिल्याचे चौकशीत समोर आले आहे.
सासऱ्याचे अनैतिक संबंध; अडसर ठरल्याने सुनेचा गळा आवळून खून, खेड तालुक्यातील घटना
श्रद्धाची हत्या केल्यानंतर आरोपी आफताबने तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले. त्याने मृतदेहाचे तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले. हळुहळु तो सर्व तुकडे फेकून देत होता. अटकेनंतर आफताबने चौकशीत सांगितले की, डेक्सटर नावाच्या वेब सीरिजमधून त्याला हत्येची कल्पना सुचली. डेक्सटर वेब सीरिजचे मुख्य पात्र एकाच वेळी दोन भिन्न जीवन जगत होते. एकीकडे धूर्त मारेकऱ्याप्रमाणे तो मृतदेहाच्या तुकड्यांची विल्हेवाट लावायचा आणि दुसरीकडे तो सामान्य माणसाप्रमाणे लोकांमध्ये राहत होता. रविवारी साक्षी खून प्रकरणातील आरोपीने खुनापूर्वी अनेक वेब सीरिज पाहिल्याची कबुलीही दिली.
आरोपी साहिलच्या खुलाशानंतर त्याने कोणती वेब सीरिज पाहिली होती, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. मात्र, साहिलने कोणती वेबसीरिज पाहिल्यानंतर हत्येचा कट रचला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. एकामागून एक अनेक वेब सिरीज पाहिल्यानंतर आरोपी साहिलने हत्येचा कट रचला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.