दिल्लीतील अल्पवयीन मुलीच्या हत्येने संपूर्ण देश हादरला आहे. पण आता या प्रकरणात एक मोठा ट्विस्ट आला आहे. मुलीच्या इन्स्टाग्राम चॅट हिस्ट्रीमधून अनेक नवीन गोष्टी समोर येत आहेत. ती एकापेक्षा जास्त अकाऊंटवरून संवाद साधत असावी. तिचं एक इन्स्टाग्राम अकाऊंट बंद होतं आणि ती दुसऱ्या अकाऊंटवरून संवाद साधायची. एबीपी न्यूजने तिचं इन्स्टाग्राम चॅट शोधून काढलं आहे. ज्यावर 6 एप्रिलपासून तिचं मित्राशी संभाषण सुरू झालं होतं.
टीव्ही रिपोर्ट्सनुसार, मुलगी आणि नीतूच्या इन्स्टाग्राम चॅटवरून असे समोर आले आहे की ती घरात बंद असल्याबद्दल बोलत आहे कारण साहिलच्या कुटुंबीयांना नात्याबद्दल माहिती मिळाली आहे. व्हिडिओमध्ये एक आवाज ऐकू येतो ज्यामध्ये 'मला पप्पांनी घरात कोंडून ठेवलं आहे. कुठेही जाऊ देत नाही" असं म्हटलं आहे. तर आईने सांगितले की तिला साहिलबद्दल अजिबात माहित नव्हतं. आई कॅमेऱ्यासमोर म्हणाली, "मी त्यावेळी तिथे असते आणि हे जर एखाद्या मुलीसोबत झालं असतं तर तिला वाचवण्याचा नक्कीच प्रयत्न केला असता. त्या रात्री 10-12 लोक बघत राहिले पण कोणीही वाचवण्याचा प्रयत्न केला नाही."
जेव्हा मुलीच्या आईला मुलीला घरात कोंडून ठेवण्याबद्दल' विचारण्यात आले तेव्हा तिने सांगितले की कोणीही तिला कोंडून ठेवलेलं नाही. ती व्हिडीओ बनवायची. आई म्हणाली की, जर तिला साहिलबद्दल माहिती असतं तर हे घडलं नसतं. मग मुलगी तिच्या मैत्रिणीच्या घरी 10 दिवस का थांबली होती? या प्रश्नाच्या उत्तरात आई म्हणाली, "तिच्या (मुलीची मैत्रीण नीतू) नवऱ्याला तुरुंगात टाकलं होतं, त्यामुळे ती म्हणाली की काकी, मला कोर्टात जावं लागेल. दोन लहान मुलं आहेत. ही मुलांना शिकवेल आणि मला मदत करेल." एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
"साहिलने रागाच्या भरात नाही तर कट रचून केली हत्या; 3 दिवस बनवत होता प्लॅन"
आरोपी साहिलने दिल्ली पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केला आहे. त्याला त्याच्या कृत्याबद्दल कोणताही पश्चाताप नसल्याचं त्याने म्हटलं आहे. दिल्ली पोलिसांच्या चौकशीत साहिलने आपल्याला गुन्हा केल्याचा कोणताही पश्चाताप नसल्याचं सांगितलं आहे. साहिलने सांगितले की, घटनेच्या वेळी तो खूप संतापला होता. यामागचे कारण असेही आहे की, अनेक दिवसांपासून मुलगी त्याच्याकडे दुर्लक्ष करत होती. मुलीला साहिलसोबत ब्रेकअप करायचे होते, असे सांगितले जात आहे. त्यामुळेच तिने साहिलपासून दूर व्हायला सुरुवात केली, त्य़ाला हे सहन होत नव्हतं.