नरेश रहिले, गोंदिया: शहरातील ज्योती स्टोर्स सर्कस मैदान मरघट रोड गोंदिया व गोरेलाल चौकातील स्टेटस मेन्स विअर या दोन दुकानात निवीया या नामवंत कंपनीच्या नावाचे बनावटी ११६ फुलबॉट व १५१ नग टी शर्ट विक्री करीत असतांना त्या कंपनीचे विकास अधिकारी यांच्या तक्रारीवरून दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
ज्योती स्टोर्स सर्कस मैदान मरघट रोड गोंदिया या दुकानाचे मालक करण गिरधारीलाल मनुजा (३८) रा. सिंधी कॉलनी गोंदिया यांनी ११६ फुटबॉल त्या नामवंत कंपनीच्या नावावर विक्री करायला बनावट वस्तू ठेवल्या होत्या. त्या वस्तूची किंमत ६९ हजार ६०० रूपये, तर गोरेलाल चौकातील स्टेटस मेन्स विअर दुकानाचे मालक सचिन प्रमोद सोनवाने रा. नूतन शाळेजवळ रामनगर याने मुप्ती नावाने १५१ टी शर्ट विक्री करीता ठेवल्या होत्या नामवंत कंपनीच्या नावावर बनावटी साहित्य ते विक्री करीत होते. ब्रांड प्रोटेक्टर इंडिया प्रायव्हेट लिमीटेड१२२ सेक्टर, १५ पार्ट हिरयाणा योथील महेंद्र सोहन सिंग (३६) यांच्या तक्रारीवरून गोंदिया शहर पोलिसांनी दोन्ही आरोपींवर कॉपीराईट ॲक्स कलम ५१, ६३, ६५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक शरद सैदाने करीत आहेत.